जेजे फ्लायओव्हरवर अपघातात दोन ठार
By Admin | Updated: November 9, 2014 00:55 IST2014-11-09T00:55:22+5:302014-11-09T00:55:22+5:30
दक्षिण मुंबईकडे जेजे फ्लायओव्हरहून सुसाट वेगाने जाणा:या दुचाकीला शनिवारी सायंकाळी 5 वाजता अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

जेजे फ्लायओव्हरवर अपघातात दोन ठार
मुंबई : दक्षिण मुंबईकडे जेजे फ्लायओव्हरहून सुसाट वेगाने जाणा:या दुचाकीला शनिवारी सायंकाळी 5 वाजता अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती ठार झाल्या असून, मोहम्मद शाहीद मोहम्मद रफीक शेख (22) आणि आसमा मोहम्मद शफीक शेख (21) अशी त्यांची नावे आहेत, अशी माहिती पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कवळेकर यांनी दिली. दरम्यान, जेजे फ्लायओव्हरवर दुचाकी वाहनांना प्रवेश नाही. परंतु मोहम्मद अली रोडवरील कोंडी टाळण्यासह फोर्टला वेगाने पोहोचता यावे आणि वेळेची बचत व्हावी म्हणून अनेक दुचाकीस्वार वाहतूक पोलिसांच्या नजरा चुकवून जेजे फ्लायओव्हरवरून प्रवास
करतात. (प्रतिनिधी)