वृद्ध दाम्पत्याच्या घरातून २ किलो सोने चोरले
By Admin | Updated: July 29, 2015 02:08 IST2015-07-29T02:08:37+5:302015-07-29T02:08:37+5:30
घर रिकामे असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याच्या घरातून तब्बल २ किलो सोने लंपास केले. याबाबत पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

वृद्ध दाम्पत्याच्या घरातून २ किलो सोने चोरले
मुंबई : घर रिकामे असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याच्या घरातून तब्बल २ किलो सोने लंपास केले. याबाबत पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
घाटकोपरच्या पंतनगर परिसरातील पल्लवी सोसायटीमध्ये अंटोनी आणि कॉन्सेप्टा फेरो हे वृद्ध दाम्पत्य राहाते. त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्यापैकी एकाकडे हे दाम्पत्य २० जुलैपासून गेले होते. आठवड्याभराने ते घरी परतले तेव्हा त्यांना दरवाजा उघडाच आढळला. त्याचप्रमाणे कपाटामधील २ किलो वजनाचे दागिने अणि ४० हजार रुपये लंपास केल्याचे त्यांना समजले. त्यांनी तत्काळ पंतनगर पोलीस ठाण्यात ही महिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. दरम्यान, चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करून ही घरफोडी केल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)