क्रेनच्या धडकेत दोन जण जखमी

By Admin | Updated: January 14, 2017 07:12 IST2017-01-14T07:12:33+5:302017-01-14T07:12:33+5:30

क्रेनच्या धडकेत झालेल्या अपघातात पोलिसासह एक दुचाकीस्वार तरुण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री मुंबई सेंट्रल येथे घडली.

Two injured in crane collision | क्रेनच्या धडकेत दोन जण जखमी

क्रेनच्या धडकेत दोन जण जखमी

मुंबई : क्रेनच्या धडकेत झालेल्या अपघातात पोलिसासह एक दुचाकीस्वार तरुण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री मुंबई सेंट्रल येथे घडली. दोघांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी मकसुद अहमद बरकतअली अन्सारी (२६) याला अटक केली आहे.
व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक दत्तात्रय बाबूराव साबळेसह दुचाकीस्वार भावेश गांधी जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटी जंक्शन पठ्ठे बाबूराव मार्ग येथे भरधाव वेगाने आलेल्या क्रेनने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरून निघालेले पोलीस नाईक साबळे रस्त्याकडेला फेकले गेले. तर त्यांच्यापाठोपाठ गांधीही यामध्ये जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी अटकेच्या भीतीने अन्सारीने घटनास्थळावरून पळ काढला.

Web Title: Two injured in crane collision