पक्षांतरावरून नाईक समर्थकांत दोन गट
By Admin | Updated: December 9, 2014 01:16 IST2014-12-09T01:16:37+5:302014-12-09T01:16:37+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते गणोश नाईक यांच्या भाजपा समावेशाच्या सहभागाचे नाटय़ अद्याप संपलेले नाही. पक्षांतराविषयी आता नाईक समर्थकांमध्येच दोन गट निर्माण झाले आहेत.

पक्षांतरावरून नाईक समर्थकांत दोन गट
नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते गणोश नाईक यांच्या भाजपा समावेशाच्या सहभागाचे नाटय़ अद्याप संपलेले नाही. पक्षांतराविषयी आता नाईक समर्थकांमध्येच दोन गट निर्माण झाले आहेत. एक गट राष्ट्रवादीमध्ये राहण्यासाठी आग्रही आहे, तर ज्यांना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभव होण्याची भीती वाटते ते सर्व भाजपासाठीच आग्रही आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीमधील अपयशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व पुढील निवडणुकीमध्ये निवडणूक लढू इच्छिणा:या पदाधिका:यांचे धाबे दणाणले आहे. अनेक प्रभागांमध्ये दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पिछाडीवर गेली आहे. यामुळे साहेब काहीही करा, पण राष्ट्रवादी सोडा असा आग्रह गुरुवारी विष्णुदास भावे नाटय़गृहात पदाधिका:यांनी धरला. यामुळे नवी मुंबईमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच नाही तर शिवसेना, काँग्रेस व भाजपामध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीमधून काही नगरसेवक भाजपामध्ये तर काही शिवसेनेत प्रवेश करणार होते. काँग्रेसचेही काही जण भाजपाच्या संपर्कात होते. परंतु खुद्द नाईकच भाजपाच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट होताच सर्वाचीच समीकरणो धुळीस मिळाली आहेत. नाईक समर्थकांमध्येही दोन गट निर्माण झाले आहेत. ज्या नगरसेवकांना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभव होण्याची भीती वाटते त्यांना भाजपामध्ये जाण्याची घाई झाली आहे. स्वत: भाजपात गेले तरी अपयश येऊ शकते. परंतु नाईक साहेबच भाजपात गेले तर त्यांना वैयक्तिक मानणारे नागरिक व भाजपाची मते यामुळे सहज विजय होईल असे गणित मांडण्यात येत आहे.
नाईक समर्थकांमधील एक मोठा गट साहेबांनी राष्ट्रवादीमध्ये राहावे या मताचा आहे. गणोश नाईक यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली तेव्हा बहुतांश पदाधिकारी त्यांच्यासोबत आले होते. त्या पक्षांतराला बंडाचे स्वरूप प्राप्त झाले होते. परंतु राष्ट्रवादीमध्ये नाईक स्वत: दहा वर्षे मंत्री राहिले आहेत. एक मुलगा खासदार तर दुसरा आमदार राहिला आहे. पुतण्यास महापौर पद मिळाले आहे. नवी मुंबईत पक्ष चालविण्यास पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. यामुळे जर पक्षांतर केले तर सत्तेसाठी पक्ष बदलला असे वातावरण निर्माण होऊ शकते. सत्तेशिवाय नाईक राहू शकत नाहीत असा संदेश नागरिकांमध्ये जाईल असे मत काही पदाधिका:यांनी व्यक्त केले आहे.याशिवाय माथाडी कामगार व सातारा, पुणो जिलतील पदाधिकारी हे राष्ट्रवादीमध्येच राहण्याची शक्यता आहे. यामुळे पक्ष न बदलता राष्ट्रवादीमध्ये राहावे असे मत व्यक्त केले जात आहे.
शवसेना सोडली तेव्हा ती बंडखोरी होती. आता वर्षानुवर्ष सत्तेत राहून पक्ष सोडला तर ते बंड नसून सत्तेसाठी तडजोड केल्याची नागरिकांची भावना होईल. नाईक साहेबांची प्रतिमा खराब होईल यामुळे साहेबांनी राष्ट्रवादीमध्ये थांबावे असे समर्थकांचे मत आहे. याशिवाय सातारा व पुणो जिल्ह्यातील पदाधिकारी हे राष्ट्रवादीशी बांधील आहेत. नाईक यांना मानणा-या या गटाकडूनही साहेबांनी राष्ट्रवादीमध्ये थांबावे असे मत काही पदाधिका:यांनी व्यक्त केले आहे.
च्राष्ट्रवादी काँग्रेसविषयी राज्यात असंतोष आहे. यामुळे महापालिका निवडणूकित अपयशास सामोरे जावे लागणार आहे. पक्षात छगन भुजबळ, आर. आर. पाटील, सुनील तटकरे यांच्या प्रमाणो गणोश नाईक यांना सन्मान दिला जात नाही.
च् सत्ता असूनही शहरातील एफएसआय, कचरा व इतर शासनदरबारी असलेले प्रश्न सोडविण्यासाठी नेतृत्वाने सहकार्य केले नाही. यामुळे भाजपात प्रवेश करणो आवश्यक आहे.
च् साहेब आले नाही तरी आम्ही पक्ष सोडू असे काही पदाधिकारी बोलत आहेत तर साहेब घेतील तो आमचाही निर्णय असे मत काहींनी व्यक्त केले.
च्राष्ट्रवादी काँग्रेसने गणोश नाईक यांना दहा वर्ष महत्वाचे मंत्रीपद दिले. दोन आमदार, खासदार व महापौर पद एकाच घरात असणारे नाईक कुटुंबिय राज्यातील एकमेव होते.
च्शिवसेना सोडली तेव्हा ती बंडखोरी होती. आता वर्षानुवर्ष सत्तेत राहून पक्ष सोडला तर ते बंड नसून सत्तेसाठी तडजोड केल्याची नागरिकांची भावना होईल. नाईक साहेबांची प्रतिमा खराब होईल यामुळे साहेबांनी राष्ट्रवादीमध्ये थांबावे असे समर्थकांचे मत आहे.
च्याशिवाय सातारा व पुणो जिल्ह्यातील पदाधिकारी हे राष्ट्रवादीशी बांधीलकी असलेल्यांनीही साहेबांनी राष्ट्रवादीमध्ये थांबावे असे मत व्यक्त केले आहे.