दोन दिवसांत तीन मुली गायब

By Admin | Updated: May 3, 2017 05:49 IST2017-05-03T05:49:31+5:302017-05-03T05:49:31+5:30

शहरातील विविध भागातून तीन अल्पवयीन मुली गायब झाल्याने खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Two girls disappeared in two days | दोन दिवसांत तीन मुली गायब

दोन दिवसांत तीन मुली गायब

भिवंडी : शहरातील विविध भागातून तीन अल्पवयीन मुली गायब झाल्याने खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कामतघर येथील मंगल शिवाजी शिंदे यांची मुलगी तानुबाई (१६) ही सोमवारी रात्री घराबाहेर गेली असता तिला कुणीतरी अनोळखी व्यक्तीने फूस लाऊन पळवून नेले, अशी तक्रार शिंदे यांनी नारपोली पोलीस ठाण्यात दाखल केली.
गैबीनगर येथील डॉक्टरकडे औषधोपचारासाठी गेलेली मुलगी सीमा अस्लम कुरेशी (१६) ही घरी परत आली नसल्याने तिची आई सईदा अस्लम कुरेशी हिने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच वेताळपाडा येथील अनिता महेशकुमार विश्वकर्मा (१७)हिला घरातून कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिची आई अनिता विश्वकर्मा हिने शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two girls disappeared in two days