दोन माजी आमदार भाजपात दाखल

By Admin | Updated: January 24, 2017 04:23 IST2017-01-24T04:22:20+5:302017-01-24T04:23:53+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढत असून, अनेक विद्यमान नगरसेवकांचे पक्षांतराचे सत्र सुरू झालेले असताना

Two former MLAs filed for the BJP | दोन माजी आमदार भाजपात दाखल

दोन माजी आमदार भाजपात दाखल

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढत असून, अनेक विद्यमान नगरसेवकांचे पक्षांतराचे सत्र सुरू झालेले असताना आता माजी आमदारांचेही पक्षांतर सुरू झाले आहे. माजी आमदार मंगेश सांगळे, कृष्णा हेगडे यांच्यासह शिवसेना नगरसेविका लीना शुक्ला, मनसेचे नगसेवक भालचंद्र आंबोरे, काँग्रेसचे नगसेवक परविंदसिंग भामरा, शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश नाईक आणि अभिनेते दिलीप ताहील यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
मनसेचे विक्रोळी येथील माजी आमदार मंगेश सांगळे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मंगेश सांगळे हे विक्रोळी कन्नमवार परिसरातून सुरुवातीला नगरसेवक त्यानंतर आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. दिवंगत शिवसेना नेते डॉ. रमेश प्रभू यांचे ते जावई असून, विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेच्या चांदिवली येथील विद्यमान नगरसेविका लीना शुक्ला, मनसेचे जोगेश्वरी येथील नगरसेवक भालचंद्र आंबोरे आणि मालाड येथील काँग्रेस नगरसेवक परविंदसिंग भामरा यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश नाईक यांनीही भाजपात प्रवेश
केला. हिंदी चित्रपट अभिनेते दिलीप ताहील यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two former MLAs filed for the BJP