साथीच्या आजारांचे मुंबईत दोन बळी
By Admin | Updated: July 13, 2015 01:59 IST2015-07-13T01:59:47+5:302015-07-13T01:59:47+5:30
गेल्या आठवड्यापासून मुंबईत साथीच्या आजारांनी बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रविवारी मुंबईत लेप्टोचे दोन नवे रुग्ण आढळले असून, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे

साथीच्या आजारांचे मुंबईत दोन बळी
मुंबई : गेल्या आठवड्यापासून मुंबईत साथीच्या आजारांनी बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रविवारी मुंबईत लेप्टोचे दोन नवे रुग्ण आढळले असून, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे; तर स्वाइन फ्लूमुळे एकाचा मृत्यू झाला.
मुंबईत लेप्टोचे ४६ रुग्ण आढळले असून, १६ जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळी पार्क साइट परिसरातील ३१ वर्षीय रुग्णांचा लेप्टोमुळे मृत्यू झाला आहे.
याला ४ जुलैला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान ९ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)