कचराकुंडीत सापडले दोन दिवसांचे बाळ

By Admin | Updated: September 30, 2016 02:51 IST2016-09-30T02:51:50+5:302016-09-30T02:51:50+5:30

डोंगरी येथील एका कचराकुंडीत दोन दिवसांची मुलगी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चिमुकलीला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डोंगरी

Two days old baby found in a trash | कचराकुंडीत सापडले दोन दिवसांचे बाळ

कचराकुंडीत सापडले दोन दिवसांचे बाळ

मुंबई : डोंगरी येथील एका कचराकुंडीत दोन दिवसांची मुलगी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चिमुकलीला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डोंगरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
डोंगरी येथील मुंडा गल्लीतील कचराकुंडीतून बुधवारी रात्री रडण्याचा आवाज आला. नागरिकाने त्याकडे धाव घेतली असता दोन दिवसांच्या चिमुकलीला कोणी तरी फेकून दिल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी तिला बाहेर काढले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनीही तेथे धाव घेतली. या मुलीला ताब्यात घेत उपचारासाठी तिला जे.जे. रुग्णालयात दाखल केले.
या परिसरात सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे येथे मुलीला फेकून दिल्यास आपण कुणाच्याही नजरेत पडणार नाही, याबाबत आरोपीला माहिती होते. त्यामुळे ती जवळपास राहणारीच व्यक्ती असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिकांसह जवळपासच्या प्रसूतिगृहांमध्ये पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती डोंगरी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Two days old baby found in a trash