Join us

दोन दिवसांत साडेसात लाखांहून अधिक जणांनी केला एसटीने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 03:21 IST

शुक्रवारी पाच लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले पाच महिने एसटी वाहतूक बंद होती. परंतु गुरूवारपासून ती सुरू झाली. गुरूवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत साडेसात लाखांहून अधिक जणंनी एसटीने प्रवास केल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.पाच महिन्यांनी जिल्ह्यांतर्गत एसटी सुरू झाल्यानंतर गुरुवारी राज्यातंर्गत (अंतर जिल्हा व जिल्हा अंतर्गत) दिवसभरात एसटीच्या २४९३ बसद्वारे ११६६६ फेऱ्यांद्वारे २ लाख ५८ हजार ४०७ प्रवाशांनी प्रवास केला. तर दुसºया दिवशी प्रवाशांच्या प्रतिसादात मोठी वाढ झाली. शुक्रवारी पाच लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.गणेशोत्सवामुळे प्रवासी वाढलेएसटीची २० टक्के वाहतूक सुरू आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी लोक घराबाहेर पडत आहेत. शुक्रवारी गुरुवारच्या तुलनेत प्रवाशांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली, असे महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी, काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले.