दोन दिवस 31 गावी अंधार

By Admin | Updated: October 4, 2014 23:02 IST2014-10-04T23:02:54+5:302014-10-04T23:02:54+5:30

डहाणू तालुक्यातील कासा गंजाड भागातील 31 गावे दोन दिवस वादळी पावसामुळे वीज गायब झाल्याने अंधारात बुडाली होती.

Two days, 31 in the morning, darkness | दोन दिवस 31 गावी अंधार

दोन दिवस 31 गावी अंधार

>कासा : डहाणू तालुक्यातील कासा गंजाड भागातील 31 गावे दोन दिवस वादळी पावसामुळे वीज गायब झाल्याने अंधारात बुडाली होती. नेमकी नवात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी व दुस:या दिवशी विसर्जनासाठी वीज नसल्याने नागरीकांची मोठी गैरसोय झाली. तसेच सतत दोन दिवस वीज नसल्याने उकाडय़ाने नागरीकांची हैराणी झाली होती.
तालुक्यातील ग्रामीण भागात गुरूवारी सुमारे तासभर प्रचंड वादळी पाऊस झाल्याने खेडय़ापाडय़ात व रस्त्यावर ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या वीजवाहक तारावर पडल्याने वायर जमिनीवर तुटून पडल्या होत्या तर काही ठिकाणी छोटे मोठे वृक्ष विजेच्या खांबावर व वायरवर पडल्याने वीजेचे खांबही मोलमडून पडले होते. काही ठिकाणी तर विजवाहक तारा व खांब घरावरही पडले होते. त्यामुळे कासा, चारोटी, गंजाड परिसराती वीजपुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान कासा व बाजूच्या काही गावात दुस:या दिवशी वीजपुरवठा सुरू करण्यात आला मात्र खेडय़ापाडय़ातील धामटणो, पेठ, तवा, उर्से, साये, खानीव, सोनाळे, आंबेदा, ब:हाणपुर, नानीवली, दहयाळे, कांदरवाडी आदी गावत दोन दिवस उलटून गेले मात्र तरीही अद्याप वीजपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. दरम्यान वीजपुरवठा खंडीत झाल्याने नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गरबा खेळणा:या हौशी लोकांची पंचाईत झाली. तसेच विसर्जनासाठी विज नसल्याने विसर्जनाठिकाणी मोठी अडचण झाली होती. तसेच दोन दिवस तब्बल वीजपुरवठा खंडीत होता. त्यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम झाला होता. तसेच दिवस व रात्रभराच्या उकाडय़ामुळे नागरीक हैराण झाले होते. (वार्ताहर)
 
वीज नसल्याने त्रस्त
4पारोळ :  ऑक्टोबर हिट यातच ग्रामीण भागात दोन दिवसापासून वीज गायब झाल्याने नागरीक हैाण झाले असून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.  वीज नसल्यामुळे व उकाडय़ात वाढ यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून त्यांना झोप मिळत असल्याचे कारण डॉक्टर सांगतात. दस:याच्याही दिवशी वीज गायब झाल्यामुळे अनक ठिकाणी पुजेचे विधी अंधारात उरकावे लागले व त्या रात्रीही वीज नसल्यामुळे दस:याच्या निमित्ताने आयोजित केलेले अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले.

Web Title: Two days, 31 in the morning, darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.