अभियंता बिराजदारला दोन दिवसांची कोठडी
By Admin | Updated: January 16, 2015 03:22 IST2015-01-16T03:22:22+5:302015-01-16T03:22:22+5:30
रायगड जिल्हा परिषदेतील लाचखोर प्रभारी कार्यकारी अभियंता प्रल्हाद बिराजदार याला १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

अभियंता बिराजदारला दोन दिवसांची कोठडी
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेतील लाचखोर प्रभारी कार्यकारी अभियंता प्रल्हाद बिराजदार याला १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. हे आदेश अलिबागच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी आज दिले.
पाणीपुरवठ्याच्या ११ कामांच्या फाईल मंजूर करण्यासाठी राजा केणी यांच्याकडे २० हजार रुपयांची लाच घेताना बिराजदार याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १४ जानेवारीला रंगेहाथ पकडले होते. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. दरम्यान, बिराजदार यांच्या घरी सुमारे साडेबारा लाख रुपये सापडले आहेत. त्याने कोठे कोठे प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. याची माहिती घेत असल्याचे लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कलगुटकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)