दहिसरमध्ये दोन दरोडेखोरांना अटक

By Admin | Updated: April 21, 2015 05:47 IST2015-04-21T05:47:06+5:302015-04-21T05:47:06+5:30

दहिसर परिसरात गुरुवारी एस. व्ही. रोडवरील रवींद्र हॉटेलमध्ये दरोडा घालणाऱ्या रवी सोनी (२०) आणि महेश पटेल (२३) या दरोडेखोरांना एमएचबी पोलिसांनी आज अटक केली.

Two dacoits arrested in Dahisar | दहिसरमध्ये दोन दरोडेखोरांना अटक

दहिसरमध्ये दोन दरोडेखोरांना अटक

मुंबई : दहिसर परिसरात गुरुवारी एस. व्ही. रोडवरील रवींद्र हॉटेलमध्ये दरोडा घालणाऱ्या रवी सोनी (२०) आणि महेश पटेल (२३) या दरोडेखोरांना एमएचबी पोलिसांनी आज अटक केली.
या हॉटेलमधील वेटर मनोज भुइया याला सोनी आणि पटेल यांनी चॉपरचा धाक दाखवून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्याची पर्स हिसकावून त्यातील साडेतीन हजार रुपये काढून घेत पळ काढला होता. या दोघांना आज बोरीवली परिसरातून अटक करण्यात आल्याचे एमएचबी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुमित चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Two dacoits arrested in Dahisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.