मुंबईतून पावणे दोन कोटींचे रक्तचंदन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:06 IST2021-04-06T04:06:07+5:302021-04-06T04:06:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत चोरी करून आणलेला पावणे दोन कोटींच्या रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यास गुन्हे शाखेला यश ...

मुंबईतून पावणे दोन कोटींचे रक्तचंदन जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत चोरी करून आणलेला पावणे दोन कोटींच्या रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष पाचने ही कारवाई केली असून, याप्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, सायन माहीम लिंक रोड परिसरात अवैधरीत्या पळविलेले रक्तचंदनाचे लाकडी ओंडके घेऊन एक टेम्पो येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली हाेती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष पाचच्या प्रभारी पोलीस निरीक्षक मोहिनी लोखंडे यांनी तत्काळ वरिष्ठांना कळवून सापळा रचला. मात्र, टेम्पो चालक पसार झाला. त्याने तो माल सहार रोड येथील न्यू संजय नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फारसी पाडा येथील गोडावूनमध्ये उतरविल्याची माहिती पाेलिसांना तपासाअंती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने रविवारी तेथे छापा टाकून १ कोटी ७७ लाख ९५ हजार ८५० रुपये किमतीचे १७७९ किलो ५८५ ग्रॅम वजनाचे रक्तचंदनाचे लाकडी ओंडके जप्त केले. याप्रकरणी आतापर्यंत चाैघांना अटक करण्यात आली असून, उर्वरित साथीदारांचा शोध घेणे सुरू आहे.
.............................