Join us

मुंबईत एकाच नंबरच्या दोन कार, त्याही ताज हॉटेलसमोर पार्क; कोणाचे कटकारस्थान, पोलिसही चौकशीला लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 15:09 IST

कुलाबा पोलिसांनी या प्रकाराची माहिती मिळताच दोन्ही कार पोलीस ठाण्याकडे नेल्या आहेत. एका कारच्या मालकाने आपल्या सारखाच नंबर असलेली अर्टिगा पाहताच पोलिसांना याची माहिती दिली. 

मुंबईत एक विचित्र प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलिसांनी भंबेरी उडाली आहे. एकाच नंबरच्या दोन कार त्या देखील ताज हॉटेलबाहेर पार्क केलेल्या सापडल्या आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्याच असताना एकाच नंबरच्या या दोन कार कोणी कटकारस्थान तर रचत नाहीय ना अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. 

कुलाबा पोलिसांनी या प्रकाराची माहिती मिळताच दोन्ही कार पोलीस ठाण्याकडे नेल्या आहेत. एका कारच्या मालकाने आपल्या सारखाच नंबर असलेली अर्टिगा पाहताच पोलिसांना याची माहिती दिली. 

या दोन्ही कार मारुतीच्या अर्टिगा आहेत. दोन्ही गाड्यांचा व्हिडीओ आला आहे. यामध्ये MH01EE2388 या नंबरच्या दोन कार दिसत आहे. या दोन्ही कार मागे-पुढे उभ्या असल्याने चालकाच्या ही गोष्ट लक्षात आली. 

ही कार चोरीची असू शकते, गुन्ह्यात वापरली जाऊ शकते. यामुळे सावध झालेल्या खऱ्या नंबरच्या चालकाने ही बाब पोलिसांना सांगितली आहे. तसेच आता या डुप्लिकेट कारने किती सिग्नल तोडले, किती नियम तोडले जे खऱ्या कारच्या मालकाला  भरावे लागले आहेत किंवा भरावे लागणार आहेत, हे देखील तपासावे लागणार आहे. 

टॅग्स :कार