Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशी दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल २,८४४ अर्जांचे वितरण :  आज स्वीकृती-वितरण बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 09:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील एक अर्ज ‘एन’ विभागातून, तर एक अर्ज ‘के पूर्व’-‘के पश्चिम’ विभागातून दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे दोन हजार ८४४ अर्जाचे वितरण पालिकेच्या २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांतून झाले आहे. नाताळनिमित्त गुरुवारी सार्वजनिक सुटी असल्याने उमेदवारी अर्जांचे वितरण आणि स्वीकृती दोन्ही बंद राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी चार हजार १६५, तर दुसऱ्या दिवशी दोन हजार ८४४, असे दोन दिवसांत एकूण सात हजार उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी कोणीही उमेदवारी अर्ज भरला नव्हता. दुसऱ्या दिवशी बुधवारी २ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

वॉर्डनिहाय अर्ज वाटप

वॉर्ड    अर्ज     संख्या ए,बी,ई    १०९ सी,डी    ५६ एफ-उत्तर    ९८ एफ-दक्षिण     ८३ जी उत्तर     २८६ जी दक्षिण    ५२ एल    १११  एल    ७८ एम पूर्व    ३४० एम पश्चिम    १७४ एन    ७७एस    १०६ टी    ९७ एच पूर्व    ९४एच पश्चिम    १४६ के पश्चिम    १९३ के पूर्व-के पश्चिम    ३२ पी दक्षिण    ७१ पी उत्तर    १२० पी पूर्व    १२८ आर दक्षिण     ९० आर मध्य     ६०  आर उत्तर     ४३  एकूण     २,८४४

English
हिंदी सारांश
Web Title : Two Nomination Forms Filed, 2,844 Distributed; Acceptance Closed Today

Web Summary : Two nomination forms filed for Mumbai Municipal Corporation elections on Wednesday. Distribution of 2,844 forms occurred across 23 election offices. Acceptance closed Thursday due to Christmas holiday.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२६महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६