पीएमसी बँक घोटाळ्यातील दोघा लेखा परिक्षकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 04:21 IST2019-11-12T04:21:31+5:302019-11-12T04:21:35+5:30
पीएमसी बँक घोटाळ्यातील दोघा लेखा परिक्षकांना अटक करण्यात आली आहे.

पीएमसी बँक घोटाळ्यातील दोघा लेखा परिक्षकांना अटक
मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यातील दोघा लेखा परिक्षकांना अटक करण्यात आली आहे. जयेश संघानी आणि केतन लाकड़वाला या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे. बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराची दोघाहीआरोपींना पूर्ण कल्पना होती. दोघांच्याही चौकशीत समाधानकारक माहिती न मिळाल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.