अडीच हजार वर्षांचा तरुण बुद्ध

By Admin | Updated: May 4, 2015 03:30 IST2015-05-04T03:30:11+5:302015-05-04T03:30:11+5:30

आज वैशाख पौर्णिमा... भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस. याच दिवशी राजपुत्र सिद्धार्थला ज्ञानप्राप्ती झाली व ते गौतम बुद्ध बनले

Twenty two thousand year old young Buddha | अडीच हजार वर्षांचा तरुण बुद्ध

अडीच हजार वर्षांचा तरुण बुद्ध

आज वैशाख पौर्णिमा... भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस. याच दिवशी राजपुत्र सिद्धार्थला ज्ञानप्राप्ती झाली व ते गौतम बुद्ध बनले. आणि याच पौर्णिमेला या महामानवाचे महापरिनिर्वाण झाले. या ऐतिहासिक दिवसाला अडीच हजारांहून अधिक वर्षांचा काळ लोटला आहे. घड्याळाच्या धावत्या काट्याने जगाचा चेहरा बदलला, तंत्रज्ञानाने सर्वकाही एका अ‍ॅपवर आणून ठेवले; पण मानवी मन अधिकच अशांत झाले.
या अशांत मनाला भ़ बुद्धाची तत्त्वे आजही आपलीशी वाटतात. एवढेच काय तर घर किंवा आॅफीस घेताना तेथे भ़ बुद्धाचे शिल्प असावे, ही मागणी आवर्जून केली जाते. तसेच भ़ बुद्धांच्या विपश्यना विद्येची जगभरात अडीचशेहून अधिक केंदे्र आहेत. तेथे ही विद्या शिकण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चित्रकारालाही भ़ बुद्ध कलाकृती रेखाटण्याचा मोह आवरता येत नाही, तर बौद्ध भिक्खूंचाही बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार तितक्याच प्रखरतेने सुरू आहे. या धावत्या जगातही बौद्ध तत्त्वज्ञानाकडे बहुतांश जण का वळत आहेत, हे जाणून घेतले आहे टीम ‘लोकमत’ने...
(सचिन लुंगसे, अमर मोहिते, स्नेहा मोरे, तेजस वाघमारे)

Web Title: Twenty two thousand year old young Buddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.