टीएमटीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
By Admin | Updated: February 25, 2017 23:04 IST2017-02-25T23:04:33+5:302017-02-25T23:04:33+5:30
भरधाव वेगाने चाललेल्या टीएमटी बसने कॅडबरी सर्कल येथे एका मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचे दोन दात पडले असून, त्याला इतर दुखापती झाल्याप्रकरणी पसार

टीएमटीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
ठाणे : भरधाव वेगाने चाललेल्या टीएमटी बसने कॅडबरी सर्कल येथे एका मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचे दोन दात पडले असून, त्याला इतर दुखापती झाल्याप्रकरणी पसार टीएमटी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यास अद्यापही अटक केली नसल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.
भिवंडी येथील विजय रामलखन (४८) यांचे दोन दात पडले आहेत. ते २४ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरून मोटार सायकलने जात होते. याचदरम्यान, ते कॅडबरी सर्कल येथे आले असताना, कॅडबरीकडून खोपटकडे जाणाऱ्या टीएमटी बसने त्यांना धडक दिली.
यामध्ये ते खाली पडले. त्या
वेळी त्यांचे दोन दात पडले
असून, डाव्या पायाच्या मांडीला फ्रॅक्चर झाले आहे, तसेच हातालाही दुखापत झाली असून, मोटरसायकलचेही नुकसान झाल्याची तक्रार राबोडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. बसचा नंबर मिळाला असून, अद्यापही चालकाचे नाव पुढे न आल्याने, त्याला अटक केली नसल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक सोनार करीत आहेत. (प्रतिनिधी)