रस्त्यांसाठी सव्वातीन कोटी

By Admin | Updated: October 29, 2014 22:18 IST2014-10-29T22:18:25+5:302014-10-29T22:18:25+5:30

अलिबाग शहरातील पाच प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.

Twenty-three crores for roads | रस्त्यांसाठी सव्वातीन कोटी

रस्त्यांसाठी सव्वातीन कोटी

अलिबाग : अलिबाग शहरातील पाच प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे सव्वा पाच कोटी रुपयांची आवश्यकता असून, तीन कोटी रुपयांचा निधी मंजूरही झाला आहे. त्यामुळे अलिबागमधील खराब रस्त्यांची समस्या आता काही अंशी निकाली निघण्यास मदत मिळणार आहे.
अलिबाग हे पर्यटनदृष्टय़ा विकसित होत असलेले शहर आहे.  मुंबईपासून अगदी जवळ असणा:या या शहराचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. पाणी, आरोग्य या समस्येबरोबरच रस्त्यांची समस्या खूपच गंभीर आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह काही अंतर्गत रस्त्यांची भयाण परिस्थिती आहे. यातून मार्ग काढण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने उशिरा का होईना सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत पालिकेला तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या निधीच्या माध्यमातून अलिबाग शहराचे प्रवेशद्वार असणा:या नीलिमा हॉटेल ते चेंढ:यातील मारुती मंदिर हा 2क्क् मीटरचा रस्ता, त्याचप्रमाणो आसरा हॉटेल ते नवीन पोस्ट ऑफिस (27क्मीटर), नेने फास्ट फूड कॉनर्र ते को.ए.सो. अरुणकुमार वैद्य हायस्कूल (2क्क्मीटर) हे तीन रस्ते बांधण्यात येणार आहेत. 
या रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मंजुरी लवकरच मिळणार असून, जानेवारी 2क्15 र्पयत कामांना सुरुवात होण्याची शक्यता असून सुमारे तीन महिन्यात ते पूर्ण होणार आहे, अशी माहिती अलिबाग नगर पालिकेचे अभियंता मनीष गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना दिली.  
बालाजी नाका ते आसरा हॉटेल (15क् मीटर) आणि बालाजी नाका ते महावीर चौक (2क्क् मीटर) हे रस्तेही करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून, यासाठी लागणा:या निधीचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील ज्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करीत असतानाच त्यांचे रुंदीकरणही करण्यात येणार आहे. या ठिकाणी रुंदीकरणाला कोणताच अडथळा नाही. त्यामुळे कोणतीच समस्या निर्माण होणार नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
 
1नांदगाव : मुरुड तालुक्यातील काही रस्त्यांची कामे निवडणुकीपूर्वी मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात कामाची सुरुवात होत नसल्याने तालुक्यातील नागरिक चिंताग्रस्त आहेत. निवडणूक संपताच सार्वजनिक बांधकाम कार्यालय ते विहूरपर्यतचा रस्ता त्वरित करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अभियंत्यांनी नागरिकांना दिले होते. फक्त चार किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी निवडणुकीचा निकाल लागला तरी प्रत्यक्षात कामास सुरुवात होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम खाते ही मंजूर कामे करणार का तशीच रेंगाळत ठेवणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. 
 
2मुरुड तालुका हे पर्यटन स्थळ असले तरी येथील रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्डय़ामुळे पर्यटक तसेच स्थानिक नागरिक खूप त्रस्त झाले आहेत. ऑटो रिक्षा, विक्रम रिक्षा चालक सुध्दा हे या खड्डय़ांमध्ये खूप हैराण झाले आहेत. मुरुड ते दांडे व तेलवडे ते सावली या भागात खड्डे मोठय़ा प्रमाणावर आहेत. 
 
3मुरुड सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता प्रभाकर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, खड्डे डांबराने पूर्ववत करण्यासाठी नियोजन सुरु आहे. लवकरच महाडच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेवून निधीची मागणी करुन सुमारे 15 दिवसाच्या आत खड्डे भरण्याचे काम जलदगतीने सुरु होईल, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Twenty-three crores for roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.