ब्रहाणपूर व टेणमध्ये चौरंगी लढत
By Admin | Updated: January 25, 2015 22:50 IST2015-01-25T22:50:34+5:302015-01-25T22:50:34+5:30
पक्ष मजबूत तर उमेदवार दुर्बळ तर काही गटात उमेदवार भक्कम पक्ष दुर्बळ असे चित्रही दिसत आहे मात्र मनसे हद्दपार झाली.

ब्रहाणपूर व टेणमध्ये चौरंगी लढत
मनोर : जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीची ग्रामीण भागात धामधूम सुरू असून ब्रहाणपूर व टेन पंचायत समितीमध्ये चौरंगी लढत होत असून टेण ग्रामपंचायत हद्दीतील नाते गोत्यातले तीन उमेदवार पंचायत समितीच्या रिंगणात आहेत. पक्ष मजबूत तर उमेदवार दुर्बळ तर काही गटात उमेदवार भक्कम पक्ष दुर्बळ असे चित्रही दिसत आहे मात्र मनसे हद्दपार झाली.
जिल्हापरिषद ब्रहाणपूर व पंचायत समिती टेन निवडणुकांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना भाजप व बहुजन विकास आघाडी अशी चौरंगी लढत होत असून जो तो आपआपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदार राजाची मनधरणी करण्याचे काम करीत असून एकत्रीत अंदाज बांधत आहे की कुटुंब कुटुंबामध्ये विभागणी झाली आहे प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती विविध पक्षाचे उमेदवार असून मतांची विभागणी होईल त्याचा लाभ तिसऱ्याला होण्याची शक्यता ग्रामीण भागातील आदिवासी गावांमध्ये दिसत आहे. तसेच अनुभवी उमेदवाराची व्यक्ती म्हणून मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु एका कुटुंबातील तीन ते चार व्यक्ती उमेदवार असून मतदारांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसत आहे. निवडणुका संपल्यानंतर त्यांच्यामध्ये रागरोषही निर्माण होण्याची दाट शक्यता दिसत आहे. (वार्ताहर)