मध्य रेल्वेकडून बारा सुपर फास्ट विशेष ट्रेन

By Admin | Updated: March 7, 2015 01:43 IST2015-03-07T01:43:41+5:302015-03-07T01:43:41+5:30

मध्य रेल्वेकडून बारा सुपर फास्ट विशेष ट्रेन दादर ते भुसावळ आणि एलटीटी ते लखनौ आणि नागपूरदरम्यान चालविण्यात येणार आहेत.

Twelve Super Fast Special Trains from Central Railway | मध्य रेल्वेकडून बारा सुपर फास्ट विशेष ट्रेन

मध्य रेल्वेकडून बारा सुपर फास्ट विशेष ट्रेन

मुंबई : मध्य रेल्वेकडून बारा सुपर फास्ट विशेष ट्रेन दादर ते भुसावळ आणि एलटीटी ते लखनौ आणि नागपूरदरम्यान चालविण्यात येणार आहेत. मार्च महिन्यात या भागात असलेली गर्दी पाहता बारा ट्रेन सोडण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
दादर ते भुसावळ-दादर सुपर फास्ट ट्रेनच्या चार फेऱ्या होणार आहेत. ट्रेन नंबर 0१0८१ दादरहून १३ आणि २0 मार्च रोजी २१.४५ वाजता सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी ४ वाजता पोहोेचेल. ट्रेन नंबर 0१0८२ भुसावळ येथून १४ आणि २१ मार्च रोजी ८.३५ वाजता सुटून दादर येथे त्याच दिवशी १६.२0 वाजता पोहोचेल.
एलटीटी ते लखनौ एसी ट्रेनच्या चार फेऱ्या होणार आहेत. ट्रेन नंबर 0२१११ एलटीटीहून १४ आणि २१ मार्च रोजी १४.२0 वाजता सुटून लखनौ येथे दुसऱ्या दिवशी १३.३५ वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0२११२ लखनौहून १५ मार्च आणि २२ मार्च रोजी १६.२0 वाजता सुटून एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी १७.३0 वाजता पोहोचेल. सीएसटी ते नागपूर सुपरफास्ट ट्रेनच्याही चार फेऱ्या होणार आहेत. यामध्ये ट्रेन नंबर 0१0१३ सीएसटीहून १४ आणि २१ मार्च रोजी 00.२0 वाजता सुटून नागपूर येथे त्याच दिवशी १५.00 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१0१४ नागपूरहून १४ आणि २१ मार्च रोजी २१.१५ वाजता सुटून सीएसटी येथे दुसऱ्या दिवशी सव्वाबारा वाजता पोहोचेल.

 

Web Title: Twelve Super Fast Special Trains from Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.