TVF सीईओ अरुणाभ कुमारांच्या अडचणीत वाढ,आणखी एक गुन्हा
By Admin | Updated: March 30, 2017 22:34 IST2017-03-30T22:34:17+5:302017-03-30T22:34:17+5:30
एंटरटेनमेंट चॅनेल ‘द व्हायरल फीव्हर’ (TVF) चे सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही

TVF सीईओ अरुणाभ कुमारांच्या अडचणीत वाढ,आणखी एक गुन्हा
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - एंटरटेनमेंट चॅनेल ‘द व्हायरल फीव्हर’ (TVF) चे सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये. त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईच्या वर्सोव्हा पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापुर्वी काल एका तरूणीच्या तक्रारीनंतर अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण 2016 मधील असून पीडित तरुणी मुलाखतीसाठी गेली असता तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप तिने केला आहे. गेल्याच महिन्यात TVF ची माजी कर्मचारी असलेल्या महिलेने ब्लॉगच्या माध्यमातून अरुणाभ कुमार यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. 2014 ते 2016 दरम्यान TVF मध्ये काम करत असताना आपला लैंगिक छळ करण्यात आल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिलं होतं. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
TVF ने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच खोटं आरोप करणा-या आणि चुकीची माहिती देणा-यांना सोडणार नाही असं म्हटलं आहे. "आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत अरुणाभ यांनी त्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, तसेच याप्रकरणी निष्पक्ष न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे", अशी मागणी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत अरुणाभ यांनी केली होती.