टीव्हीवर शो पाहण्याचे प्रमाण घटले

By Admin | Updated: April 27, 2017 01:21 IST2017-04-27T01:21:20+5:302017-04-27T01:21:20+5:30

टीव्हीवर शो पाहणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण घटून ५३ टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर आले आहे. ग्राहक आता टीव्हीऐवजी लॅपटॉप, डेस्कटॉप

TV shows show a decrease | टीव्हीवर शो पाहण्याचे प्रमाण घटले

टीव्हीवर शो पाहण्याचे प्रमाण घटले

मुंबई : टीव्हीवर शो पाहणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण घटून ५३ टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर आले आहे. ग्राहक आता टीव्हीऐवजी लॅपटॉप, डेस्कटॉप आणि स्मार्टफोनवर शो पाहण्यास प्राधान्य देत आहेत, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.
अ‍ॅक्सेंचुअर या संस्थेने २६ देशांत केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढला आहे. सर्वेक्षणात २६ हजार ग्राहकांना सहभागी करून घेण्यात आले होते. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, १0 पैकी ४ ग्राहकांनी (४२ टक्के) सांगितले की, ते टीव्हीवरील शो पाहण्यासाठी आता लॅपटॉप अथवा डेस्कटॉपला प्राधान्य देत आहेत. लॅपटॉप अथवा डेस्कटॉपला प्राधान्य देणाऱ्यांचे प्रमाण गेल्या वर्षी ३२ टक्के होते.
१३ टक्के लोकांनी सांगितले की, टीव्ही आपल्या स्मार्टफोनवर पाहण्यास आपण प्राधान्य देतो. गेल्या वर्षी हे प्रमाण १0 टक्के होते. सर्वेक्षक संस्थेने गेल्या ४ वर्षांच्या काळातील टीव्ही शो पाहण्याच्या कलाचा मागोवा घेतला आहे. २0१४ पर्यंत दोन तृतियांश म्हणजेच ६५ टक्के ग्राहक शो पाहण्यासाठी टीव्हीला प्राधान्य देत होते. आता हा कल एकदम उलटा फिरला आहे. आता पाचपैकी केवळ एक ग्राहक (१९ टक्के) टीव्हीवर खेळ पाहतो. गेल्या वर्षी ३८ टक्के ग्राहक टीव्हीला प्राधान्य देत होते. भारतातील कलही जगाच्या कलासोबतच आहे. टीव्हीवर शो पाहण्याचे प्रमाण गेल्या वर्षभरात ७८ टक्क्यांनी घसरले आहे. गेल्या वर्षी ४७ टक्के लोक टीव्ही पाहत होते. हे प्रमाण आता अवघे १0 टक्के उरले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: TV shows show a decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.