लग्नाचे आमिष दाखवत टीव्ही अभिनेत्रीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:00 IST2020-12-02T04:00:04+5:302020-12-02T04:00:04+5:30

लग्नाचे आमिष दाखवून टीव्ही अभिनेत्रीवर बलात्कार कास्टिंग डायरेक्टरवर गुन्हा दाखल : वर्साेवा पाेलिसांकडून चाैकशी सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...

TV actress raped for marriage | लग्नाचे आमिष दाखवत टीव्ही अभिनेत्रीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवत टीव्ही अभिनेत्रीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून टीव्ही अभिनेत्रीवर बलात्कार

कास्टिंग डायरेक्टरवर गुन्हा दाखल : वर्साेवा पाेलिसांकडून चाैकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप एका टीव्ही अभिनेत्रीने गुरुवारी केला. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी आयुष्य तिवारी नामक कास्टिंग डायरेक्टरवर गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे.

पीडित तरुणी २६ वर्षांची असून गेल्या दोन वर्षांपासून ती तिवारीला ओळखते. तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार तिवारीने तिला लग्न करण्याचे वचन दिले होते. त्यानंतर मुंबईतील अनेक ठिकाणी तिला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. वर्सोवा पोलिसांनी तिवारीविरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. पीडितेने दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाैकशी सुरू असून अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

....................................

Web Title: TV actress raped for marriage