राणीची बाग अडचणीत

By Admin | Updated: February 14, 2015 02:57 IST2015-02-14T02:57:39+5:302015-02-14T02:57:39+5:30

भायखळ्यात राणीबागेच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला, असे वाटत असताना या प्रकल्पात नवीन अडचण उभी राहिली आहे़ या प्राणिसंग्रहालयात प्रस्तावित शौचालये

Turning the Queen's Garden | राणीची बाग अडचणीत

राणीची बाग अडचणीत

शेफाली परब-पंडित, मुंबई
भायखळ्यात राणीबागेच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला, असे वाटत असताना या प्रकल्पात नवीन अडचण उभी राहिली आहे़ या प्राणिसंग्रहालयात प्रस्तावित शौचालये, पावसाळी छत आदी नागरी सुविधांच्या बांधकामांवर मुंबई पुरातन वास्तू संवर्धन समितीने आक्षेप घेत काही सुधारणा सुचविल्या आहेत़ या नवीन रोड्यामुळे जुलै २०१५ पर्यंत नूतनीकरणाची डेडलाइन गाठणे पालिकेसाठी आव्हान ठरणार आहे़
राणीची बाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या भायखळ्यातील प्राणिसंग्रहालयाचे सिंगापूरच्या धर्तीवर नूतनीकरण करण्याचा प्रकल्प पालिकेने २००७ मध्ये जाहीर करण्यात आला़ मात्र त्यानंतर सतत हा प्रकल्प कोणत्या ना कोणत्या वादात लटकला आहे़ सेंट्रल झू आॅथोरिटी, प्राणिमित्र संघटना यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार बदल केल्यानंतर आता पुरातन वास्तूनेही या प्रकल्पावर हरकत घेतली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राणिसंग्रहालयात प्रस्तावित फूड स्टॉल्स, पावसाळी छत, सार्वजनिक शौचालये, वॉटर फाउंटन यांच्या बांधकामामध्ये पुरातन वास्तू समितीने दोन महिन्यांपूर्वी महत्त्वपूर्ण बदल सुचविले आहेत़ अद्याप याबाबत पालिकेने समितीकडे खुलासा केलेला नाही़ मात्र प्राणिसंग्रहालय व उद्यान पुरातन वास्तू श्रेणी दोन (बी) मध्ये गणले जात असल्याने सुचविलेले बदल अमलात आणणे बंधनकारक असणार आहे़

Web Title: Turning the Queen's Garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.