खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. बोरघाटातील आडोशी बोगद्याच्या छताचा (गन प्लास्टर) काही भाग अचानक धावत्या वाहनांवर कोसळला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, यामुळे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला.
नेमकी घटना काय?मंगळवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ही घटना घडली. आडोशी बोगद्यातून वाहने जात असताना छताला लावलेले गन प्लास्टर, दगड आणि मातीचा ढिगारा अचानक येथून जाणाऱ्या एका खासगी बस आणि कारवर कोसळला. सुदैवाने वाहनांचा वेग मर्यादित असल्याने मोठा अनर्थ टळला.
युद्धपातळीवर कामघटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलिस आणि आयआरबी यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेले दगड आणि माती हटवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. या कामामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे बाधित झाली होती. राडारोडा हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. तातडीने माती आणि दगड हटवण्याचे काम केल्यामुळे जास्त काळ वाहतुकीची कोंडी झाली नाही. स्वप्निल पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, बोरघाट मदत केंद्र
Web Summary : A tunnel ceiling collapse on the Mumbai-Pune Expressway injured none but disrupted traffic near Khopoli. Falling debris struck a bus and car. Police quickly cleared the road, restoring traffic flow after a brief delay.
Web Summary : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर खोपोली के पास एक सुरंग की छत गिरने से यातायात बाधित हुआ, पर कोई घायल नहीं हुआ। मलबे से एक बस और कार टकरा गई। पुलिस ने तुरंत सड़क साफ कर यातायात बहाल कर दिया।