Join us

बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 06:23 IST

एनएटीएम भागात बोगद्याचे काम जलद करण्यासाठी, एक अतिरिक्त चालित मध्यवर्ती बोगदा बांधण्यात आला.

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) ते शिळफाटा दरम्यान २.७ किमीचा बोगदा पूर्ण झाला आहे.  या उपलब्धीमुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला चालना मिळाल्याचे नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) सांगितले. 

एकूण २१ किमी लांबीच्या बोगद्यांपैकी ५ किमी लांबीचा बोगदा शिळफाटा आणि घणसोली दरम्यान न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (एनएटीएम) वापरून बांधला जात आहे, तर उर्वरित १६ किमी लांबीचा बोगदा टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) वापरून बांधला जाईल. या बोगद्यात ठाणे खाडीखाली ७ किमी लांबीचा व समुद्राखालील भागाचा समावेश आहे.

एनएटीएम भागात बोगद्याचे काम जलद करण्यासाठी, एक अतिरिक्त चालित मध्यवर्ती बोगदा बांधण्यात आला. यामुळे घणसोली आणि शिळफाटा बाजूने एकाच वेळी उत्खनन करता आले.  आजूबाजूच्या संरचनांना नुकसान न होता सुरक्षित आणि नियंत्रित बोगदा बांधकाम उपक्रम सुनिश्चित करण्यासाठी, ग्राउंड सेटलमेंट मार्कर, पायझोमीटर, इनक्लिनोमीटर, स्ट्रेन गेज आणि बायोमेट्रिक ॲक्सेस कंट्रोल सिस्टमसह साइटवर व्यापक सुरक्षा उपाय लागू करण्यात आले आहेत.

टॅग्स :बुलेट ट्रेन