तुकोबारायांचा पालखी सोहळा निमगाव केतकीमध्ये विसावला

By Admin | Updated: July 20, 2015 00:34 IST2015-07-20T00:34:54+5:302015-07-20T00:34:54+5:30

निमगाव केतकी (जि. पुणे) : अंथुर्णे येथील मुक्कामानंतर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वैष्णवांचा मेळा नागवेलीच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदापूर तालुक्याच्या निमगाव केतकी गावात विसावला. यावेळी ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.

Tukobaraya's Palakhi Sohla has immersed in Nimgaon Ketaki | तुकोबारायांचा पालखी सोहळा निमगाव केतकीमध्ये विसावला

तुकोबारायांचा पालखी सोहळा निमगाव केतकीमध्ये विसावला

मगाव केतकी (जि. पुणे) : अंथुर्णे येथील मुक्कामानंतर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वैष्णवांचा मेळा नागवेलीच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदापूर तालुक्याच्या निमगाव केतकी गावात विसावला. यावेळी ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.
पालखी सोहळ्याने सकाळी अंथुर्णे येथून प्रस्थान ठेवले. त्यानंतर पालखी सोहळ्याने मार्गावरील गोतोंडी गावात विसावा घेतला. तीन तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा सायंकाळी निमगाव केतकी येथे दाखल झाला. याशिवाय विविध मंडळांनी सामाजिक उपक्रमासाठी पुढाकार घेतला. इंदापूर तालुका मुस्लीम चॅरिटेबल ट्रस्ट व मुस्लीम युवक संघटनेच्या वतीने वारकरी भाविकांना शिरखुर्मा, फराळासाठी केळी वाटप केली.
सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पालखी सोहळा दाखल झाल्याने गावात ग्यानबा तुकारामाचा जयघोष सुरू होता. जणू अवघा गाव विठुमय झाला होता. पालखी इंदापूर शहरातील मुक्कामासाठी सोमवारी सकाळी मार्गस्थ होणार आहे.

Web Title: Tukobaraya's Palakhi Sohla has immersed in Nimgaon Ketaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.