Join us  

सत्याचा झाला विजय; एनसीबीचा फर्जीवाडा उघड, मलिक कुटुंबीयांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 7:07 AM

सत्याचा झाला विजय; नवाब मलिक यांचे कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने क्लीन चिट दिली असून, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचा जो फर्जीवाडा उघड केला होता, त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची भावना मंत्री नवाब मलिक यांच्या परिवाराने, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली आहे.

सत्याचा नेहमी विजय होतो, अशी प्रतिक्रिया नवाब मलिकांच्या कन्या सना मलिक - शेख यांनी दिली आहे. एनसीबीचा फर्जीवाडा उघड झाला असून, सत्य समोर आले आहे. लवकरच मंत्री नवाब मलिक आमच्यासोबत असतील, असे शेख यांनी म्हटले. तर नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून गुन्हेगारांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आर्यन खान यांच्यासह अन्य पाचजणांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे एनसीबी आता समीर वानखेडे, त्यांच्या पथकावर, तसेच प्रायव्हेट आर्मीवर कारवाई करणार का, की गुन्हेगारांना पाठीशी घालणार, असा सवाल केला आहे. तर जे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर केले ते खरे ठरले आहेत. एनसीबीने टाकलेला छापा हीच फर्जीवाडा आहे ते पहिल्या दिवसापासून सांगत होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :नवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसआर्यन खान