ट्रकने वाहतूक पोलिसाला नेले फरफटत
By Admin | Updated: July 16, 2015 03:56 IST2015-07-16T03:56:01+5:302015-07-16T03:56:01+5:30
तालुक्यातील कर्नाळा खिंड येथे बुधवारी सायंकाळी वाहतूक कोंडी सोडवताना ट्रक चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करणारे हवालदार राजेश बैकर यांना ट्रकने फरफटत नेले.

ट्रकने वाहतूक पोलिसाला नेले फरफटत
पनवेल : तालुक्यातील कर्नाळा खिंड येथे बुधवारी सायंकाळी वाहतूक कोंडी सोडवताना ट्रक चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करणारे हवालदार राजेश बैकर यांना ट्रकने फरफटत नेले. त्यांना वाचवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश माने यांनी ट्रकच्या टायरवर सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून पाच फैरी झाडल्या. टायर पंक्चर झाल्याने बैकर यांची सुटका झाली, पण ते किरकोळ जखमी झाले. पनवेल पोलिसांनी ट्रकचालक खान याला रात्री उशिरा ताब्यात घेतले.
उदयपूर येथील टोरस कंपनीचा ट्रक लोखंडाचा चुरा घेऊन
पेणकडून पनवेलकडे चालला होता. यावेळी कर्नाळा खिंडीत एक क्रेन बाजूला करण्याचे काम वाहतूक पोलीस करत होते. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. तरीही सूचनेकडे दुर्लक्ष करत ट्रकचालकाने ट्रक पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याला थांबवण्यासाठी बैकर यांनी ट्रकवर उडी मारली आणि ते ट्रकला लटकले. तरीही त्याने वाहन न थांबवता
त्यांना फरफटत नेले. बैकर हे
यात किरकोळ जखमी झाल्याचे समजते.