ट्रकची कंटेनरला धडक; दोघे गंभीर जखमी

By Admin | Updated: July 3, 2015 22:57 IST2015-07-03T22:57:36+5:302015-07-03T22:57:36+5:30

पनवेलजवळील काळुंद्रे येथील पुलावरून पळस्पेच्या दिशेने कंटेनरला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने कंटेनर पुलाचा कठडा तोडून नदीत पडण्याची घटना

Truck hits container; Both are seriously injured | ट्रकची कंटेनरला धडक; दोघे गंभीर जखमी

ट्रकची कंटेनरला धडक; दोघे गंभीर जखमी

पनवेल : पनवेलजवळील काळुंद्रे येथील पुलावरून पळस्पेच्या दिशेने कंटेनरला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने कंटेनर पुलाचा कठडा तोडून नदीत पडण्याची घटना शुक्रवारी साडेआठच्या सुमारास घडली. यामध्ये कंटेनर चालक व त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले आहेत.
सकाळी साडेआठच्या सुमारास कंटेनर माल घेऊन पनवेलहून पळस्पे फाट्याच्या दिशेने जात असताना ट्रकने पुढे जात असताना जोरात धडक दिली. यावेळी कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने पुलाचा कठडा तोडून कंटेनर ५० फूट खाली कोसळला. यावेळी कंटेनर चालक दीपक सिंग व त्याचा सहकारी विशाल यादव हे दोघेही या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी एका खाजगी
रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आधीच अरुंद असलेल्या या पुलावर हा अपघात झाल्याने पनवेल ते पळस्पे फाटा मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी काही वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली .
वाहतूक पोलिसांनी थोड्या प्रमाणात वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र वाहतूक मंदगतीने सुरु होती. अपघात सकाळच्या सुमारास घडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही. ज्या ट्रकने धडक दिली त्या ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. उशिरापर्यंत फरार ट्रक चालकाला अटक करण्याचे प्रयत्न सुरु होते. या अपघाताची नोंद पनवेल पोलीस ठाण्यात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Truck hits container; Both are seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.