घातक घनकचरा टाकताना ट्रक पकडला

By Admin | Updated: March 30, 2015 23:45 IST2015-03-30T23:45:48+5:302015-03-30T23:45:48+5:30

मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला न देता बोईसर पूर्वेकडील खैरापाडा येथील जहांगीर चाळीच्या बाजूच्या खड्ड्यात घातक घनकचरा टाकताना बोईसर पोलीसांनी एक ट्रक पकडला

The truck is hauling the deadly solid | घातक घनकचरा टाकताना ट्रक पकडला

घातक घनकचरा टाकताना ट्रक पकडला

बोईसर : मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला न देता बोईसर पूर्वेकडील खैरापाडा येथील जहांगीर चाळीच्या बाजूच्या खड्ड्यात घातक घनकचरा टाकताना बोईसर पोलीसांनी एक ट्रक पकडला. या प्रकरणी ड्रायव्हर, ठेकेदार व कंपनीच्या व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवार दि. २८ मार्चला रात्री साडे आठच्या सुमारास खैराफाटक चेक पोस्टवर ड्युटीवर असलेल्या पोलीसांना अज्ञात इसम एमएच०४ एफ ५५९४ या ट्रकमधून प्लास्टीक गोणीमधून भरून आणलेली दुर्गंधीयुक्त केमिकल पावडर खड्ड्यात टाकत असल्याची खबर मिळाली. घटनास्थळी पोलीस पोहोचले मात्र त्या पूर्वीच ट्रकमधील अर्ध्या अधिक गोणी खड्ड्यात टाकण्यात आल्या होत्या. बोईसर पोलीसांनी उरलेल्या केमिकल युक्त गोणींसह ट्रक ताब्यात घेवून ट्रकचा चालक, ठेकेदार व कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.
हा घातक घनकचरा हा तारापूर एमआयडीसी तील प्लॉट नं. ई ९५ मधील साळवी केमिकल्सचा असून २८ मार्चच्या दुपारी साडेतीनच्या दरम्यान तो भरून पाठविण्यात आल्याची कबुली उद्योगाच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणी अहवालाच्या वेळी मंडळाचे क्षेत्र अधिकारी नंदकिशोर पाटील यांच्याकडे दिली आहे तर ट्रक व या उद्योगामधील घातक घनकचऱ्याचे नमुने म. प्र. नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन पृथ्थ:करणासाठी मुंबई येथे प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल येत्या आठ दिवसात येणे अपेक्षीत आहे. तपासणीअंती त्या घातक घनकचऱ्यामध्ये केमिकलचे प्रमाण किती आहे हे निश्चित झाल्यानंतर हा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल त्यानंतर नियमानुसार संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल असे म. प्र. नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. साळवी केमिकल्सला म. प्र. नि. मंडळाकडून उद्योग चालविण्यासाठी संपती पत्रा (कन्सेंट) ची वैधता ३१ जुलै २०१५ पर्यंत असून या उद्योगास घातक घनकचरा विल्हेवाटीसाठी केमिकल स्लज ११८.० किलो/एम तर स्पेंट कॅटलिस्ट ३६० किलो / एम मुंबई वेस्ट मॅनेजमेंट तळोजा येथे दिली आहे. हा घातक घनकचरा काळ्या रंगाच्या माती सारखा दिसणाऱ्या ओलसर पदार्थामुळे मानवी जिवीतास धोका किंवा आरोग्यास अपायकारक होऊन एखादा संसर्ग पसरण्याच्या दाट शक्यतेबरोबरच पर्यावरणास धोका निर्माण करणारा असल्याची ही शक्यता बोईसर पोलीसांनी व्यक्त केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The truck is hauling the deadly solid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.