रेल्वे स्थानकांत अपंगांना रॅम्पअभावी होतोय त्रास
By Admin | Updated: October 27, 2014 01:19 IST2014-10-27T01:19:01+5:302014-10-27T01:19:01+5:30
सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांच्या सुखसोयीसाठी भव्य रेल्वे स्थानकांची उभारणी केली आहे. मात्र याचा अपंग प्रवाशांना काहीच फायदा होत नाही

रेल्वे स्थानकांत अपंगांना रॅम्पअभावी होतोय त्रास
नवी मुंबई : सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांच्या सुखसोयीसाठी भव्य रेल्वे स्थानकांची उभारणी केली आहे. मात्र याचा अपंग प्रवाशांना काहीच फायदा होत नाही. अनेक रेल्वे स्थानकांमध्ये अपंगांसाठी विशेष जिने (रॅम्प) नसल्यामुळे अपंग प्रवाशांना त्रास होत आहे.
नेरूळ रेल्वे स्थानकामध्ये अपंग प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा सिडको आणि रेल्वे प्रशासनाने केल्या नाहीत. सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेल्या जिन्याचा वापर अपंग प्रवाशांना करावा लागत आहे. नवी मुंबई रेल्वे प्रवासी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने अपंग प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल वारंवार सिडको आणि रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तरीही प्रशासनाच्या वतीने अपंगांसाठी पर्यायी व्यवस्था अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे नेरूळ रेल्वे स्थानकामध्ये अपंग प्रवासी चढणे किंवा उतरणे पसंत करत नाहीत. रेल्वे प्रवाशांसाठी कार्यरत विविध संस्थांनी याबाबत अनेकदा निवेदने दिली आहेत. (प्रतिनिधी)