भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीच्या बंगल्यातून रोकड चोरी करणारे त्रिकूट अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:07 IST2021-02-12T04:07:41+5:302021-02-12T04:07:41+5:30
गावदेवी पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीच्या बंगल्यातून पावणेदोन लाखांची रोकड चोरी करणारा सराईत गुन्हेगार ...

भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीच्या बंगल्यातून रोकड चोरी करणारे त्रिकूट अटकेत
गावदेवी पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीच्या बंगल्यातून पावणेदोन लाखांची रोकड चोरी करणारा सराईत गुन्हेगार चेतन थुलकर आणि त्याच्या दोन साथीदारांना गावदेवी पोलिसांनी अटक केली. चोरी केलेला ऐवजही जप्त करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावदेवी परिसरात संबंधित उद्योगपतींचा बंगला आहे. तेथे त्यांचे जावई राहतात. गेल्या महिन्यात सात तारखेला बंगल्यातून पावणेदोन लाखांची रोकड चोरीला गेली. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला. दरम्यान, बंगल्याच्या सीसीटीव्हीमध्ये झाडांच्या पारंब्याना पकडून दोघेजण बाहेर जाताना दिसले. पथकाने याच पुराव्याच्या आधारे तपासाअंती कोलकाता येथून तिघांना अटक केली.
चेतन हा सराईत गुन्हेगार असून तो नागपूरचा रहिवासी आहे. एखाद्या ठिकाणी चोरी करण्यासाठी जाण्यापूर्वी तेथील सीसीटीव्हीची नजर चुकवून घरातील ऐवजावर ताे हात मारीत असे. यावेळीही त्याने त्याच पद्धतीने सीसीटीव्हीची नजर चुकवून चोरी केली. मात्र तो पोलिसांच्या जाळयात अडकला. तसेच त्याने अन्य बंगल्यांत चोरी केल्याचीही कबुली दिली असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
...................