दुहेरी हत्याकांडातील त्रिकूट गजाआड

By Admin | Updated: May 17, 2017 02:11 IST2017-05-17T02:11:41+5:302017-05-17T02:11:41+5:30

ठाकुर्लीतील किशोर चौधरी व महिमादास विल्सन या दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आकाश अहिरे (१९), सतीश शिंदे (३३) आणि सागर शिंदे (२३) यांना तिघांना अटक

Trikoot gozap in double murder | दुहेरी हत्याकांडातील त्रिकूट गजाआड

दुहेरी हत्याकांडातील त्रिकूट गजाआड

- लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : ठाकुर्लीतील किशोर चौधरी व महिमादास विल्सन या दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आकाश अहिरे (१९), सतीश शिंदे (३३) आणि सागर शिंदे (२३) यांना तिघांना अटक केली आहे. सतीश हा मुख्य आरोपी भोईर यांच्या गाडीचा चालक तर आकाश हा कार्यालयाचा शिपाई होता. कल्याण न्यायालायने त्यांना २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सागरला मंगळवारी बेड्या ठोकल्याने, त्याला उद्या बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाकुर्लीतील बालाजीनगरमधील देवी शिवामृत सोसायटीतील तळमजल्यावरील घराच्या दुरुस्तीच्या काम किशोर चौधरी यांनी घेतले होते. मात्र, आपल्या परिसरात बाहेरील व्यक्ती कामाचे कंत्राट घेत असल्याच्या रागातून दिलीप भोईर, शंकर भोईर, सूरज भोईर, सागर भोईर आणि इतर साथीदारांनी ९ मे रोजी परवानाधारक पिस्तुलातून चौधरी आणि त्यांचे साथीदार नितीन जोशी, महिमादास विल्सन यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यात चौधरी यांना १२ गोळ््या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर जोशी व विल्सन यांना प्रत्येकी एक गोळी लागल्याने ते जखमी झाले. जोशी यांच्यावर खाजगी रु गणालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृती सध्या ठीक आहे.
Þतर विल्सनला आरोपींनी गाडीतून पळवून नेले. रस्त्यात त्याचा गळा आवळून ठार मारले, तसेच त्याचा मृतदेह पोलादपूर तालुक्तील हलदुले व दाभीळ टोंक गावाच्या शिवारतील १२०० फूट खोल दरीत फेकला होता.
दरम्यान, कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने प्रथम कुणाल आणि परेश आंधळे या दोघा भावांना मालेगावातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच मुख्य आरोपी भोईर चौकडीला ११ मे रोजी कोळे गावातून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन रिव्हॉल्वर व १३ पुंगळ््या जप्त केल्या.
या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेत असताना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून आकाशला टिटवाळा येथून तर सतीश याला सोमवारी रात्री डोंबिवलीतील ज्योतीनगर वसाहतीतून अटक केली. तर सागर याला याला ठाकुर्ली परिसरातून मंगळवारी दुपारी अटक केली. पोलिसांनी सात बाइक व आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली गाडीही जप्त केली आहे.

आंधळे बंधूंची सुटका
भोईर यांचे साथीदार असलेले कुणाल आणि परेश आंधळे या दोघा भावांना पोलिसांनी मालेगावातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, ज्या वेळी हे हत्याकांड घडले, त्या वेळी आंधळे बंधू लग्नासाठी गावी गेले होते. त्यामुळे सध्या तरी त्यांना पोलिसांनी सोडले आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात काहीही पुरावे सापडल्यास त्यांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

बंदुकीचा रु बाब दाखवणाऱ्यांचा
परवाना रद्द करणार - दिघावकर

- ठाकुर्ली गोळीबार हत्याकांड हे परवानाधारक बंदुकीतून झाला असल्याने कल्याण पोलीस सर्तक झाले आहेत.
- बंदुकीचे परवाना दिलेल्यांची प्रथम चौकशी केली जाणार आहे. स्वरक्षणासाठी ज्यांनाच खरी बंदुकीची गरज आहे, अथवा ज्यांच्या जिवाला धोका आहे, अशा व्यक्तींच्या बंदुकीच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाईल.
- शायनिंग व विनाकारण बंदुकीचा रुबाब दाखवणाऱ्या व्यक्तींचा परवाना रद्द करण्यात येईल, असे अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांना ५५ हजारांचे बक्षीस
महिमादास विल्सन याचा मृतदेह दरीत फेकल्याचे कळल्यानंतर, पोलीस पथकातील नितीन मुदगुल, मोहन कमलकर, प्रशांत भागवत आणि सोमनाथ हे दरीत उतरले होते. त्यांनी ट्रेकरची मदत घेत दास याचा मृतदेह पोलादपूर तालुक्यातील दाभीळ टोंक येथून बाहेर काढला होता. या पोलिसांना ५५ हजार रु पयांचे बक्षीस देऊन त्यांच्या सन्मान केला आहे.

Web Title: Trikoot gozap in double murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.