Join us
Daily Top 2Weekly Top 5

वांद्रे येथे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाला दिली श्रद्धांजली

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 23, 2025 19:51 IST

ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेले शूर सैनिक मुरली नाईक यांच्या वीर माता ज्योती नाईक यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

मनोहर कुंभेजकर, मुंबई-जम्मू काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने सुधारली आहे. कलम ३७० आणि ३५ अ हटवल्यानंतर लोक देशाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत.अलगाववादी शक्तींनी शरणागती पत्करली आहे  हा तर डॉ. मुखर्जींच्या विचारांचा विजय आहे, असे गौरवोद्गार जम्मू काश्मीर विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील कुमार शर्मा यांनी काल वांद्र्यात सत्काराला उत्तर देताना काढले.डॉ. मुखर्जी स्मृती सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले.डॉ मुखर्जी यांचे बलिदान केवळ एका व्यक्तीचे बलिदान नव्हते, तर ते भारताच्या स्वाभिमान आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी होते असे त्यांनी सांगितले.

 भाजपचे  उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांच्या  दीप कमल फाउंडेशनने वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे  डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी शहीद दिनाचे आयोजन केले होते.राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड.आशिष शेलार यांच्या हस्ते सर्व सन्मानितांचा सत्कार केला.मुंबईची ही भूमी केवळ आर्थिक  राजधानी नाही तर वैचारिक क्रान्तीची ही राजधानी आहे. 

यावेळी ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेले शूर सैनिक मुरली नाईक यांच्या वीर माता ज्योती नाईक यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात आणि अश्रूंनी दुमदुमून गेले होते.

आयोजक अमरजीत मिश्रा म्हणाले की, गेल्या १७ वर्षांपासून हा कार्यक्रम देशभक्ती, संवेदना आणि निष्ठेच्या भावनेने आयोजित केला जात आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे बलिदान आपल्यासाठी केवळ इतिहास नाही तर प्रेरणास्त्रोत आहे.लाल चौकात डॉ. मुखर्जी यांचा पुतळा बसवण्याची आणि श्रीनगर रेल्वे स्टेशनचे नाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी श्रीनगर रेल्वे स्टेशन असे देण्याची मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :आशीष शेलार