आदिवासी महिलांना कायमस्वरूपी मिळणार मोफत सॅनिटरी पॅड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 00:57 IST2020-10-07T00:57:08+5:302020-10-07T00:57:13+5:30
- मनोहर कुंभेजकर मुंबई : गोरेगाव (पूर्व ) आरेमधील खडकपाडा येथील १०० आदिवासी महिलांना मोफत कायमस्वरूपी सॅनिटरी पॅड उपलब्ध ...

आदिवासी महिलांना कायमस्वरूपी मिळणार मोफत सॅनिटरी पॅड
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : गोरेगाव (पूर्व ) आरेमधील खडकपाडा येथील १०० आदिवासी महिलांना मोफत कायमस्वरूपी सॅनिटरी पॅड उपलब्ध झाले असून महिलांच्या आरोग्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे.
पॅडवूमन म्हणून ओळख असलेल्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व ती फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. भारती लव्हेकर यांनी त्यांच्या डिजिटल पॅड बँकेतून या महिलांना लागणारे सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले असून, त्यांची मोलाची मदत आपल्या अभिषेक सामाजिक व शैक्षणिक शिक्षण संस्थेला मिळाली आहे. येत्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी महिलांना आमदार लव्हेकर यांच्या सहकार्याने आपल्या संस्थेमार्फत सॅनिटरी पॅड
आणि इम्युनिटी पॉवर गोळ्या त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत.
जेणेकरून आदिवासी महिलांचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहील असा ठाम विश्वास सुनीता नागरे यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार लव्हेकर यांनी मंजू बरफ, आशा बरफ, वनिता सुतार, सीता सुतार यांना सॅनिटरी पॅडचे वाटप केले. यावेळी प्रभाग क्रमांक ६०चे नगरसेवक योगीराज दाभाडकर, तसेच अभिषेक सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष सुनीता नागरे, तसेच सुनंदा रेडकर, जयश्री रेडकर आदी उपस्थित होते.