आदिवासींना आधार खाजगी दवाखान्यांचा

By Admin | Updated: December 20, 2014 22:17 IST2014-12-20T22:17:05+5:302014-12-20T22:17:05+5:30

रूग्णालयाच आजारी झाले असून आदिवासी बांधवाना खाजगी दवाखान्यातील महागडा उपचार घ्यावा लागत आहे.

Tribal support for private clinics | आदिवासींना आधार खाजगी दवाखान्यांचा

आदिवासींना आधार खाजगी दवाखान्यांचा

मोखाडा ग्रामीण : तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या एकमेव ग्रामीण रूग्णालयात कोणत्याच सुविधा नसल्यामुळे रूग्णालयाच आजारी झाले असून आदिवासी बांधवाना खाजगी दवाखान्यातील महागडा उपचार घ्यावा लागत आहे.
डॉक्टर आहे तर नर्स नाही नर्स आहे तर डॉक्टर नाही यामुळे रूग्णालयाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. रूग्णांना प्यायला पाणी नाही, औषधे, गोळ्या मिळत नाहीत. रूग्णवाहिकेसाठी डिजेलचे अनुदान नाही. खाटांची कमतरता, एक्स-रे मशीन कायमच बंद रूग्णालयातील नर्सचा मनमानी कारभार यामुळे आदिवासी रूग्णांची हेळसांड होत असून उपचाराविना परवड होत आहे. स्वातंत्र्याची ६७ वर्ष उलटल्यानंतरही या रूग्णालयात कोणत्याच सुविधा नाहीत ही बाब खेदाने म्हणावी लागेल यामुळे इथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत चालली असून यामुळे नेहमीच पैशाची चणचण भासणाऱ्या आदिवासीच्या खिशाला झळ बसते आहे. खाजगी दवाखान्यातील महागडा उपचार घ्यावा लागत आहे. परंतु याचे कोणालाही सोयर सुतक नसून या यातना किती दिवस सोसायच्या असा येथील आदिवासी बांधव प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारत आहेत. (वार्ताहर)

1मोखाडा तालुक्यात २६५ गावपाडे असून तालुक्याची लोकसंख्या लाखावर पोहोचली आहे. खेड्यापाड्यातून आदीवासी बांधव उपचारासाठी येत असतात परंतु या रूग्णालयात कोणत्याच सुविधा नाहीत. स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ या महत्वाच्या डॉक्टरांची पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत.

2मोखाडा रूग्णालयासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यासह एकुन २७ पदे मंजुर आहेत मात्र केवळ दोन वैद्यकीय अधिकारी पाच परीचालकासह २० कर्मचारीच रूग्णालय चालवत आहे.
3मुख्य वैद्यकीय अधिकारी सहा. अधिक्षक वैद्यकीय अधिकारी, अर्थपरीचारीला, लिपीक, कक्षसेवक, शिपाई कामगार ही पदे रिक्त आहेत. शासनाकडून औषधाचा पुरवठा होत नसल्याने औषधाचा तुटवडा आहे. विकत पाणी, औषधे घ्यावी लागत आहेत.

Web Title: Tribal support for private clinics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.