आदिवासी साहित्य संमेलन 2014
By Admin | Updated: November 10, 2014 22:41 IST2014-11-10T22:41:07+5:302014-11-10T22:41:07+5:30
जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार येथे दि. 8 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत भव्य आदिवासी साहित्य संमेलनाचे आयेाजन करण्यात आले आहे.

आदिवासी साहित्य संमेलन 2014
जव्हार: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार आणि मॉसाहेब शैक्षणिक व सामाजिक संस्था, जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार येथे दि. 8 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत भव्य आदिवासी साहित्य संमेलनाचे आयेाजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील साहित्यिक व कवींना व्यासपीठ उपलब्ध झाल्याने या सोहळ्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.
गुलमोहर मतीमंद शाळेतील मुलांचे स्वागतगीत तसेच संमेलनाच्या अध्यक्षा विमलताई पटेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. आदिवासींच्या पारंपरिक तारपा नृत्याने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर अहमदनगर येथील प्राध्यापिका डॉ. माहेश्वरी गावित यांचे आदिवासी साहित्य, परंपरा, भाषा, रुढी या विषयावर व्याख्यान झाले. राज्याच्या प्रमुख 15 आदिवासी जिल्ह्यात व इतर भागात आदिवासी समाजाच्या चालीरिती, रुढी, परंपरा याबाबत सविस्तर माहिती देताना स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात आदिवासी क्रांतीकारकांनी उचललेला महत्वाचा वाटा, त्यांचे योगदान उपेक्षितच असल्याची खंत व्यक्त केली.
या संमेलनाच्या निमित्ताने आदिवासी समाज जरी एक असला तरी विविध भागातील रुढी परंपरा आदान-प्रदान झाल्याने आयोजकांचे आभार मानले. त्यानंतर आदिवासी साहित्य या विषयावर विकास कांबळे व भाषा शुद्धी कविता वाचन साहित्य वाचन या विषयांवर प्रा. प्रज्ञा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
दुस:या दिवशी 9 तारखेला आदिवासी धर्म आणि संस्कृती या विषयावर प्राथमिक शिक्षक मधुकर भोये, आदिवासी साहित्य या विषयावर प्रा. तुकाराम धांडे व आदिवासी क्रांतीकारक या विषयावर प्रा. शिक्षक रवी बुधर यांचे व्याख्यान झाले. दुपारच्या सत्रत कविता व चारोळ्या वाचन या विषयावर सागर भोईर यांचे व्याख्यान झाल्यानंतर काव्यवाचन स्पध्रेचे आयेाजन करण्यात आले. या स्पध्रेत पालघर जिल्ह्यासह ठाणो नाशिक, औरंगाबाद येथील कवी, विद्यार्थीनी, विद्यार्थी व नवकविंनी उत्साहाने भाग घेत आपल्या कवितांतून आदिवासी समाजाच्या व्यथा, आव्हाने, प्रोत्साहनपर कविता सादर करून संमेलनात रंग भरले. (वार्ताहर)