तिवरांसाठी ‘ट्रेंच लेस’ प्रणाली

By Admin | Updated: May 13, 2015 23:50 IST2015-05-13T23:50:22+5:302015-05-13T23:50:22+5:30

सिडको वसाहतीत महानगर गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. इतर ठिकाणी खोदकाम करण्यात आले असले तरी कांदळवन वाचविण्याकरिता कोपरा

Trench Lace System for Tivoli | तिवरांसाठी ‘ट्रेंच लेस’ प्रणाली

तिवरांसाठी ‘ट्रेंच लेस’ प्रणाली

अरुणकुमार मेहेत्रे, कळंबोली
सिडको वसाहतीत महानगर गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. इतर ठिकाणी खोदकाम करण्यात आले असले तरी कांदळवन वाचविण्याकरिता कोपरा खाडीखालून पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्याकरिता ‘ट्रेंच लेस’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून गेल्या दीड महिन्यापासून हे काम सुरू असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.
पनवेल परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सिडकोकडून पायाभूत सुविधांचे जाळे पसरविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणजे पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होय. त्यासाठी महानगर गॅस निगम लिमिटेडद्वारे पाइपलाइन टाकण्याचे काम ठिकठिकाणी सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात खारघरपर्यंत गॅसच्या वाहिन्या टाकण्यात आल्या. आता पनवेल, शेंडुगपर्यंत या गॅसवाहिन्यांचा विस्तार करण्यात आला आहे. खारघर आणि कळंबोली दरम्यान कोपरा खाडी व कांदळवन असल्याने त्या पट्ट्यातील गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम थांबले होते. मात्र या ठिकाणी पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एलटी मशिनद्वारे ट्रेंच लेस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

Web Title: Trench Lace System for Tivoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.