होळीसाठी झाडे तोडली जात आहेत? १९१६ या क्रमांकावर करा तक्रार

By जयंत होवाळ | Published: March 21, 2024 07:36 PM2024-03-21T19:36:36+5:302024-03-21T19:37:32+5:30

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वृक्षतोड करू नये.

Trees being cut down for Holi Complain on 1916 | होळीसाठी झाडे तोडली जात आहेत? १९१६ या क्रमांकावर करा तक्रार

होळीसाठी झाडे तोडली जात आहेत? १९१६ या क्रमांकावर करा तक्रार

मुंबई: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच ‘होळी’च्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास महापालिका अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलिस ठाण्यास कळवावे किंवा पालिकेच्या १९१६ या 'टोल फ्री' क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. 

‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’ अंतर्गत कलम २१ अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे हा अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी  १ हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. शिवाय  एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा देखील होऊ शकते. 

Web Title: Trees being cut down for Holi Complain on 1916

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई