शिवसेना शाखा क्रमांक आठतर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:06 IST2021-06-06T04:06:14+5:302021-06-06T04:06:14+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शनिवारी शिवसेना शाखा क्रमांक आठतर्फे वृक्षारोपण आणि वृक्ष वाटप करण्यात आले. ...

Tree plantation by Shiv Sena branch number eight | शिवसेना शाखा क्रमांक आठतर्फे वृक्षारोपण

शिवसेना शाखा क्रमांक आठतर्फे वृक्षारोपण

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शनिवारी शिवसेना शाखा क्रमांक आठतर्फे वृक्षारोपण आणि वृक्ष वाटप करण्यात आले.

शिवसेना शाखा क्रमांक आठचे शाखाप्रमुख भूपेंद्र कवळी यांनी आयोजित कार्यक्रमात आमदार विभागप्रमुख विलास पोतनीस यांच्या हस्ते वृक्षारोपण व वृक्षवाटप करण्यात आले.

दहिसर पश्चिम जयवंत सावंत मार्ग, एस. वी. पी. मार्ग राम मंदिर, बोरिवली पश्चिम शांती आश्रम व इतर हाऊसिंग सोसायटीत पेरू, जांभूळ, फणस, पारिजात, बकुळ, एकझरा, कडूलिंब अशा विविध प्रकारची शेकडो झाडे लावण्यात आली. याप्रसंगी विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांच्यासमवेत महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, विभाग संघटक बाळकृष्ण धमाले, महिला उपविभाग संघटक दीपा पाटील, शाखाप्रमुख भूपेंद्र कवळी, शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

........................................................

Web Title: Tree plantation by Shiv Sena branch number eight