झाडाने अडवली मध्य रेल्वेची वाट

By Admin | Updated: June 11, 2014 02:11 IST2014-06-11T02:11:39+5:302014-06-11T02:11:39+5:30

पावसाळ्यात रेल्वेचा बो:या वाजण्याआधीच मंगळवारी त्याचे प्रात्यक्षिकच रेल्वे प्रवाशांना दिसून आले.

The tree blocked the central railway | झाडाने अडवली मध्य रेल्वेची वाट

झाडाने अडवली मध्य रेल्वेची वाट

>मुंबई : पावसाळ्यात रेल्वेचा बो:या वाजण्याआधीच मंगळवारी त्याचे प्रात्यक्षिकच रेल्वे प्रवाशांना दिसून आले. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरील अप जलद मार्गावर एक अवाढव्य झाडाने मध्य रेल्वेची वाट अडवली. हे झाड ओव्हरहेड वायर आणि रुळावर कोसळल्याने मध्य रेल्वेचा पुरता खोळंबा झाला आणि कामावरून घरी परतणा:या प्रवाशांना त्याचा फटका बसला. या घटनेमुळे 30 लोकल रद्द करण्यात आल्या. 
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरील सहा नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर असणारे एक अवाढव्य झाड स्थानकाच्या आतील बाजूस संध्याकाळी पावणोसहाच्या सुमारास पडले. 6 आणि 5 नंबर प्लॅटफॉर्मच्या दरम्यान हे झाड ओव्हरहेड वायर आणि रुळावर पडल्याने त्याचा फटका मध्य रेल्वेला बसला. सीएसटी आणि कल्याणच्या दिशेने जाणारी जलद लोकल सेवाच ठप्प झाली. त्यामुळे या मार्गावरील सेवा दोन्ही धिम्या मार्गावर वळवली. तोर्पयत हे झाड हटवण्याचे  आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. यासाठी रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात आला. त्याचा फटका कामावरून घरी परतणा:या प्रवाशांना बसतच गेला. धिम्या लोकलबरोबरच जलद मार्गावरील लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावू लागल्या. 
झाड हटवणो आणि  दुरुस्तीचे काम आठच्या सुमारास पूर्ण केले. त्यानंतर डाऊन जलद मार्ग हा रात्री 8.10 तर अप जलद मार्ग साडेआठच्या सुमारास पूर्ववत केला. हे मार्ग जरी पूर्ववत केले तरी रात्री उशिरार्पयत लोकल वीस ते पंचवीस मिनिटे उशिरानेच धावत होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: The tree blocked the central railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.