कोठारे आo्रमशाळेचा प्रकल्प राज्यात पाहिला
By Admin | Updated: December 10, 2014 22:46 IST2014-12-10T22:46:05+5:302014-12-10T22:46:05+5:30
झोपायला निव्वळ भुई, ठाणो जि.प. च्या प्राथमिक शाळा एकीकडे डिजीटल होऊ लागल्या असताना नवनवीन शैक्षणिक सुविधाही मिळवित आहेत.

कोठारे आo्रमशाळेचा प्रकल्प राज्यात पाहिला
भरत उबाळे ल्ल शहापूर
ना शाळागृह, ना शैक्षणिक सोयी, आंघोळीच्या अन् पिण्याच्या पाण्याचीही प्रचंड गैरसोय, ज्ञानार्जनासाठी बसायला आणि रात्री झोपायला निव्वळ भुई, ठाणो जि.प. च्या प्राथमिक शाळा एकीकडे डिजीटल होऊ लागल्या असताना नवनवीन शैक्षणिक सुविधाही मिळवित आहेत. मात्र ना खडू ना धड फळा असे आदिवासी विकास प्रकल्पाच्या दुर्लक्षाचे संकट उभे ठाकले असताना शासनाच्या शैक्षणिक सुविधांच्या अभावातूनही शहापूर तालुक्यातील कोठारे येथील शासकीय आदिवासी माध्यमिक आo्रमशाळेच्या विद्याथ्र्यानी बालविज्ञान परिषदेत राज्यात पहिला नंबर मिळविल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.
कोठारे येथे 2क्क्2 मध्ये तत्कालीन आमदार दौलत दरोडा यांच्या प्रय}ाने ही आदिवासी माध्यमिक आo्रमशाळा मंजूर करण्यात आली. त्यास आता 13 वर्षे पूर्ण होत आहेत. 1क्क् मुली व 154 मुले असलेल्या या शाळेत पहिली ते दहावीर्पयतचे वर्ग आहेत. 13 वष्रे होऊनही या शाळेत असंख्य गैरसोयी विद्याथ्र्याना सोसाव्या लागत आहेत. मुळात शाळागृहच नसल्याने एका घरात ही शाळा भरवावी लागत आहे. तेथे भुईवरच बसून ज्ञानार्जन करावे लागते. शिवाय रात्री झोपताना देखील भुईचाच आधार घ्यावा लागत आहे. तालुक्यात ठाणो जि.प. च्या प्राथमिक शाळा डिजीटल होत असून सुधारीत होऊ लागल्या असताना या शाळेला शैक्षणिक सोयींच्या अगिAदिव्यातून जावे लागत आहे. आंघोळी व पिण्यासाठी दूरवरून बैलगाडीने पाणी आणावे लागत आहे. या गावातील नळयोजना पाच वष्रे रखडल्याने टंचाईचा फटका शाळेला देखील बसत आहे. शैक्षणिक सोयींचे दुर्भिक्ष असलेतरी आदिवासी विद्याथ्र्यामध्ये शिक्षणाचा अपार उत्साह आहे. मुबलक पर्जन्यमानाचे हे क्षेत्र असल्याने हवेच्या घटकांमुळे पिकांवर होणारा रोगांचा प्रादूर्भाव अभ्यासणो हा विषय घेऊन इयत्ता 9वीच्या शंकर बाळू दरोडा, राहुल लखांबरे, विजय दरोडा, साजण गुरगुडे या विद्याथ्र्यानी विज्ञान शिक्षक संदीप कदम यांच्या सोबत राज्यस्तरीय बालविज्ञान परिषदेत प्रकल्प सादर केला. त्यासाठी त्यांनी 86 टक्के शेतकरी हळवा प्रकाराचे भातपिक घेतात याची आधी माहिती घेतली. हळव्या भातपिकावर 9क् टक्के करपा रोग आढळला. पेरणी वेळेत होऊनही 76 टक्के लावणी उशिरा झाल्यामुळे करपा रोग व किडींचा प्रादुर्भाव पिकांच्या लोंबी अवस्थेत आढळून आला. ब:याच अंशी शेतकरी 86 टक्के श्ेातातून गोळा केलेले भात बियाणो वापरतात याचा अभ्यास केला. यासाठी 3 टक्के मिठाच्या द्रावणात प्रक्रिया करावी व नंतर थारमाईटची पुरक प्रक्रिया करून बियाणो सावळील सुकवावे. असे केल्यास रोगांचा प्रादुर्भाव टळतो असा उपायही या विद्याथ्र्यानी सुचविला आहे. भातपिकांविषयी अधिक माहिती घेण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र कर्जत, जि. रायगड येथील डॉ. कुणकेकर यांचीही भेट घेतली. भाताच्या बियाणांच्या विविध जाती, त्यांचा कालावधी, पिकांवर पडणारे रोग, त्यांची कारणो, बियाणांनुसार पेरणी व लावणीच्या आदर्श तारखा जाणून घेतल्या.
6 कोटी 85 लाख 131 रुपयांचा निधी शाळागृहासाठी मंजूर झाला आहे. सा.बा. शहापूर उपविभाग दुर्लक्ष करीत असल्याने शाळागृहाचे काम रखउले आहे.
- लोमेश सलामे,
आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, शहापूर