महापरिनिर्वाण दिनाच्या काळात प्रवासी वाढले
By Admin | Updated: December 11, 2014 02:23 IST2014-12-11T02:23:15+5:302014-12-11T02:23:15+5:30
महापरिनिर्वाण दिनी आणि त्याच्या दुस:या दिवशी उपनगरीय लोकल सेवेतून मोठय़ा प्रमाणात प्रवाशांनी प्रवास केल्याने मध्य रेल्वेला चांगले उत्पन्न मिळाले आहे.

महापरिनिर्वाण दिनाच्या काळात प्रवासी वाढले
मध्य रेल्वेला उपनगरीय सेवेतून सात कोटी
मुंबई : महापरिनिर्वाण दिनी आणि त्याच्या दुस:या दिवशी उपनगरीय लोकल सेवेतून मोठय़ा प्रमाणात प्रवाशांनी प्रवास केल्याने मध्य रेल्वेला चांगले उत्पन्न मिळाले आहे. तब्बल 7 कोटी 9 लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. 6 आणि 7 डिसेंबर या दोन्ही दिवशी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक रद्द करण्यात आला
होता.
त्याशिवाय मध्यरात्रीच्या सुमारास विशेष लोकलही सोडल्या होत्या. त्याचाच फायदा मध्य रेल्वेला झाला. 6 डिसेंबर रोजी 31 लाख 90 हजार 240 प्रवाशांनी तर 7 डिसेंबर रोजी 31 लाख 83 हजार 923 प्रवाशांनी प्रवास केला. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी मध्य रेल्वे मार्गावरून प्रवाशांचा प्रवास कमी होत असतो. मात्र या दोन्ही दिवशी मोठय़ा प्रमाणात प्रवाशांनी प्रवास केल्याचे सांगण्यात आले. 6 डिसेंबर रोजी 3 कोटी 62 लाख आणि 7 डिसेंबर रोजी 3 कोटी 47 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
(प्रतिनिधी)