मालवण (सिंधुदुर्ग) : मुंबई येथून मालवणात पर्यटनासाठी आलेल्या एकाचा तोंडवळी येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. सुभेंदू दास (३७) असे मृताचे नाव आहे. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी घडली.मुंबई येथील अंधेरी, गोरेगाव, मीरा रोड या भागातून चार विवाहित जोडपी व तीन मुले असा अकरा जणांचा ग्रुप तोंडवळी येथे आला होता. या वेळी अर्जुन मोहन रॉय व सुभेंदू दास यांच्यासह तीन मुले समुद्रात पोहण्याचा आनंद लुटत होते तर त्यांचे सहकारी कुटुंबीय किनाºयावर होते. त्या वेळी दोघे समुद्रात बुडू लागले. ग्रामस्थांनी धाव घेत त्यांना दोरीच्या साहाय्याने किनाºयावर ओढत आणले. यातील सुभेंदू दास याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अर्जुन मोहन रॉय (४५) यांना वाचविण्यात यश आले.
मुंबईच्या पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 04:09 IST