एसएमएसवर एसटीचा प्रवास
By Admin | Updated: December 10, 2014 02:24 IST2014-12-10T02:24:02+5:302014-12-10T02:24:02+5:30
एसटीच्या प्रवाशांना एक खूशखबर आह़े कारण आता रेल्वेप्रमाणो एसटीच्या प्रवासासाठी ऑनलाइन आरक्षण करताना येणारा एसएमएस ग्राह्य धरण्यात येणार आहे.
एसएमएसवर एसटीचा प्रवास
15 डिसेंबरपासून अंमलबजावणी : व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांची माहिती
मुंबई : एसटीच्या प्रवाशांना एक खूशखबर आह़े कारण आता रेल्वेप्रमाणो एसटीच्या प्रवासासाठी ऑनलाइन आरक्षण करताना येणारा एसएमएस ग्राह्य धरण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी 15 डिसेंबरपासून केली जाणार असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी दिली. त्यामुळे आता एसटीच्या प्रवाशांना एसएमएस दाखवून प्रवास करता येणार आहे.
रेल्वेत लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे तिकीट आरक्षण ऑनलाइन केल्यानंतर मोबाइलवर आलेला एसएमएस टीसीला दाखवून प्रवाशाला प्रवास करण्याची मुभा आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत एसटी महामंडळानही अशी सेवा देण्याचा निर्णय घेतला.
एसटी महामंडळाकडून ऑनलाइन तिकीट आरक्षित करणा:या प्रवाशांना प्रवासाच्या वेळी संबंधित ई-तिकिटाची प्रत जवळ बाळगणो किंवा ई-तिकीट लॅपटॉप तसेच मोबाइलवर वाहकास दाखवणो बंधनकारक होते. या ई-तिकिटाबाबतचा एसएमएसही प्रवाशांना एसटी महामंडळाकडून पाठवण्यात येत असे.
मात्र हा एसएमएस प्रवासाच्या वेळी ग्राह्य धरला जात नसे. परंतु आता एसटी महामंडळाने यापुढे ई-तिकिटांबाबत मोबाइलवर पाठवलेला एसएमएसही ग्राह्य धरण्याचा निर्णय घेत त्यावर पुन्हा काम करण्यास सुरुवात केली आहे. या सेवेची अंमलबजावणी लवकरच केली जाणार असल्याची माहितीही एसटी महामंडळाकडून काही दिवसांपूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली होती.
आता ही सेवा देण्यास एसटी महामंडळ सज्ज झाले असून, 15 डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतल्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष संजय खंदारे यांनी सांगितले. या सेवेमुळे तिकिटांची कटकटही जाईल आणि प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्यास मदत मिळेल, असेही ते म्हणाले.
(प्रतिनिधी)
या एसएमएस सेवेबाबत काही तांत्रिक अडचणी येत होत्या. ही सेवा प्रवाशांना दिल्यानंतर त्याची माहिती एसटीच्या वाहकाकडे कशी ठेवता येईल, यावर काम सुरू होते, मात्र हा तांत्रिक तिढा सुटला आहे. त्यामुळे आता 15 डिसेंबरपासून या सेवेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.