Join us  

प्रवास ‘बेस्ट’ आहे; स्वरक्षण हवेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 12:30 AM

बस काही अंशी रिकाम्या घाटकोपर आगारकडे जाणाºया बसमध्ये कमी गर्दी असल्याने हे चित्र निदर्शनास आले नाही.

प्रवासात सामाजिक अंतर पाळले जात नाही. त्यामुळे कोरोनाला आमंत्रणच दिले जात आहे. नेहमीच्या वर्दळ असलेल्या मोठ्या रस्त्यांवर बेस्ट बसच्या फेऱ्या वाढल्या आहेत. बहुतांश बेस्टमध्ये प्रवाशांनी नियम धाब्यावर बसविले आहेत. प्रवाशांनी थोडी काळजी घ्यायला हवी़उभे प्रवासी केवळ पाच प्रवासी उभ्याने प्रवास करण्याची गरज असताना या मार्गावरील बहुतांश बसमध्ये आठ प्रवासी उभ्याने प्रवास करत होते.

बस काही अंशी रिकाम्या घाटकोपर आगारकडे जाणाºया बसमध्ये कमी गर्दी असल्याने हे चित्र निदर्शनास आले नाही. विद्याविहार रेल्वे स्थानकाकडे जाणाºया बेस्ट बसमध्येही कमी गर्दी असल्याने येथे हे चित्र निदर्शनास आले नाही. जवळच्या अंतरावर धावणाºया बेस्ट बस काही अंशी रिकाम्या धावत होत्या.

बेस्ट बस वाहकाविना

लाल बहादूर शास्त्री मार्गावर कमानी येथील बेस्ट बसस्टॉपवर चांगली बाब निदर्शनास आली. येथे काही लांब पल्ल्याच्या, जवळच्या पल्ल्याच्या बेस्ट बस वाहकाविना धावत होत्या. पहिल्या स्टॉपवर उपस्थित वाहक येथील प्रवाशांना तिकीट देत होता आणि त्यानंतरच येथून बेस्ट बस सुटत होती. त्यामुळे वाहकांचा आणि प्रवाशांचा कमीत कमी संपर्क होत असल्याचे चित्र होते.

प्रत्येक वेळी बेस्ट, महापालिका आणि सरकार यांनी आपल्याला आरोग्याची काळजी घ्या, असे सांगितले पाहिजे का? आपण स्वत:हून आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण असे करत नसू तर आपण आपल्यासोबत इतरांचा जीवही धोक्यात घालत आहोत ही सोपी गोष्ट आहे. त्यामुळे आता जरी पाळत नसलात तरी भविष्यासाठी बेस्ट बसने प्रवास करताना आपण नियम पाळले पाहिजेत. तेव्हा कुठे आपण कोरोनाला हरवू.- प्रशांत बारामती, कुर्लाआपला जीव धोक्यात घालून बेस्ट बस रस्त्यांवर धावते आहे. चालक आणि वाहक काम करत आहेत. अशा वेळी आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे. आपणच नियम मोडले तर कोरोना कसा मरणार. त्यापेक्षा सरकारने घालून दिलेले नियम पाळले तर साहजिकच कोरोनास आपण लवकर नष्ट करू शकतो.- रोहित मोहिते, घाटकोपर

अंधेरी ते कुर्ला

1.शनिवारी दुपारी १२ ते २ या वेळेत पूर्व उपनगरात बेस्ट बसमधील वस्तुस्थिती पाहिली. कुर्ला-अंधेरी या रस्त्याचा विचार करता बैल बाजार या बेस्ट बसस्टॉपवरून घाटकोपरकडे जाणाºया बहुतांश बेस्टमध्ये आरोग्याबाबतचे नियम पाळण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले.

गोराई ते कुर्ला

2.गोराई आगार ते कुर्ला रेल्वे स्थानक (पश्चिम) या ३०९ क्रमांकाच्या बेस्टमध्ये चालक आणि वाहकाचे मास्क परिधान केले होते. मात्र बहुतांश प्रवाशांनी मास्क परिधान केले नव्हते. वाहकाने बजाविल्यानंतर प्रवासी मास्क परिधान करत होते.

फिल्टर पाडा ते कुर्ला

3.फिल्टर पाडा ते कुर्ला रेल्वे स्थानक या ३२० क्रमांकाच्या बसमध्यही चालक आणि वाहकांनी मास्क परिधान केले होते. प्रवासी मात्र आरोग्याबाबत उदासीन होते.

लाल बहादूर शास्त्री मार्ग

4.लाल बहादूर शास्त्री मार्गावर कमानी या बेस्ट बसस्टॉपच्या येथे तर चित्र आणखीच वाईट होते. येथे सलग रांगेत तीन बेस्ट बसस्टॉप आहेत. मात्र येथे बसची प्रतीक्षा करत उभ्या असलेल्या प्रवाशांच्या गावी बहुतेक कोरोना नसावाच, असे चित्र होते.

विक्रोळी

5.लाल बहादूर शास्त्री मार्गावरून विक्रोळी येथे जाणारी ७ क्रमाकांची बेस्ट बस प्रवाशांची खच्चून भरली होती. लांब पल्ल्याच्या या बेस्टमध्ये चिक्कार गर्दी असतानाच सामाजिक अंतर धुळीस मिळाले होते.

दक्षिण मुंबई

6.लाल बहादूर शास्त्री मार्गावरून कमानी मार्गे कुर्ला रेल्वे स्थानक, सायन रेल्वे स्थानक आणि दक्षिण मुंबईकडे जाणाºया बहुतांश बेस्टमध्ये चिक्कार गर्दी होती. यातील सर्वच बसमध्ये चालक आणि वाहकांनी मास्क परिधान केले होते. मात्र अशा गर्दीत केवळ मास्क नाही तर सामाजिक अंतर पाळले गेले पाहिजे. दक्षिण मुंबईकडे जाणाºया बहुतांश बेस्टमध्ये पाचपेक्षा अधिक प्रवासी उभ्याने प्रवास करत होते.

टॅग्स :बेस्टमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस