Join us

रविवारी प्रवासखोळंबा निश्चित...; मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 06:58 IST

ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील.

मुंबई : विविध अभियांत्रिकी तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे उपनगरीय वाहतूक सेवेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी, २८ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी १५.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील.

हार्बर मार्गकुठे? : पनवेल ते सीएसएमटी अप आणि सीएसएमटी ते पनवेल बेलापूर डाऊन मार्गावरकिती वाजता? : सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९परिणाम : पनवेल येथून सकाळी ११:०२ ते दुपारी ३:५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०:०१ ते दुपारी ३:२० वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९:३० वाजता सुटेल आणि १०:५० वाजता पनवेल येथे पोहोचेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३:१६ वाजता सुटेल. सायंकाळी  ४:३६ वाजता पनवेल येथे पोहोचेल.

मध्य रेल्वेकुठे? : माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरकिती वाजता? : सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०:२५ ते दुपारी ३:३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान नियोजित थांब्यांनुसार डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी १०:५० ते दुपारी ३:४६ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर नियोजित थांब्यांनुसार वळवण्यात येतील. माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

टॅग्स :लोकलपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वे