Join us
Daily Top 2Weekly Top 5

३८९९ रुपयांत करा परदेशात प्रवास; एअर इंडियाची विशेष घोषणा

By मनोज गडनीस | Updated: February 2, 2024 18:05 IST

२ फेब्रुवारी ते ५ फेब्रवारी या कालावधीमध्ये काही मर्यादीत जागांसाठी ही सूट योजना लागू आहे.

मनोज गडनीस, मुंबई: अधिकाधिक प्रवाशांना विमान प्रवासासाठी आकर्षित करण्यासाठी एअर इंडिया कंपनीने नमस्ते वर्ल्ड सेल नावाने एका सूट योजनेची घोषणा केली असून या अंतर्गत काही विशिष्ट देशांसाठी एकेरी मार्गासाठी ३८९९ रुपये दर आकारण्यात येणार आहेत. तर, याचसोबत देशातील काही ठिकाणांसाठी एकेरी मार्गासाठी १७९९ रुपये तिकीट दर आकारण्यात येणार आहेत.

२ फेब्रुवारी ते ५ फेब्रवारी या कालावधीमध्ये काही मर्यादीत जागांसाठी ही सूट योजना लागू आहे. या कालावधीत बुकिंग केलेल्या तिकीटांची कालमर्यादा २ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर अशी असेल. याचसोबत बिझनेस क्लासमधील काही जागांसाठी देखील ही सूट योजना लागू असून याकरिता १०,८९९ रुपये तिकीट दर आकारण्यात येतील.

टॅग्स :एअर इंडिया